Post Office Scheme : या महागाईच्या काळात देशातील करोडो नागरिक आज पोस्ट ऑफिसच्या विविध लहान बचत योजनांमध्ये मोठी गुंतणवूक करत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांमध्ये सुरक्षित आणि हमी परतावा देत आहे. यामुळे आज अनेकांना मोठा आर्थिक फायदा देखील होत आहे. यातच तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा देखील होऊ शकते.
ग्राहकांसाठी आज पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या ठेव योजना ऑफर करते. यापैकी एक योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी केल्या जाऊ शकतात.
10 लाख ठेवीवर 5 वर्षात ₹ 4.13 लाख व्याज
पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर वार्षिक 7 टक्के व्याज मिळत आहे. हा व्याजदर 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत आहे. पोस्ट ऑफिस एफडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 5 वर्षांसाठी 10 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 14,13,373 रुपये मिळतील.
यामध्ये, व्याजातून मिळणारे उत्पन्न फक्त ₹ 4,13,373 असेल. म्हणजे 5 वर्षात फक्त व्याजातून 4 लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल. टपाल कार्यालयात 5 वर्षे मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 5 वर्षांच्या ठेवीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेतली जाऊ शकते.
याशिवाय 1 वर्षाच्या ठेवीवर 6.6 टक्के, 2 वर्षांसाठी 6.8 टक्के आणि 3 वर्षांसाठी 6.9 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत, मुदतपूर्तीनंतर, ती आणखी एका मुदतीसाठी वाढविली जाऊ शकते. यामध्ये, तुम्ही त्याच मुदतीसाठी मुदत ठेव वाढवू शकता.
कोण खाते उघडू शकते
मुदत ठेव खाती जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत रु. 1,000 मध्ये उघडता येतात. यानंतर, तुम्ही रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
या योजनेत एकल आणि संयुक्त खाते उघडता येते. संयुक्त खाते तीन प्रौढ व्यक्ती एकत्र खाते उघडू शकतात. ज्यामध्ये, अल्पवयीन खाते पालक, कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक आणि 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतात.
हे पण वाचा : PM Kisan Yojana: अर्रर्र .. ‘या’ लोकांना मिळणार नाही 2 हजार रुपये ! सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा सविस्तर