PF Money : तुम्ही देखील नवीन घर बांधणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्हाला घर बांधण्यासाठी पीएफमध्ये ठेवलेले पैसे देखील वापरता येणार आहे.
ईपीएफओ आपल्या ग्राहकांना एक विशिष्ट परिस्थितीत पीएफ खात्यामधील पैसे काढण्याची परवानगी देते, या सुविधाचा फायदा घेत तुम्ही घर बांधण्यासाठी पीएफमधील पैसे वापरू शकतात. चला मग जाणून घ्या गृहकर्ज प्रीपेमेंटसाठी पीएफचा वापर कसा करू शकतात.
कर्ज परतफेडीसाठी वापरले जाऊ शकते
ईपीएफ योजनेच्या कलम 68-बीबीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर त्याच्या पीएफमध्ये जमा केलेली रक्कम कर्जाची रक्कम भरण्यासाठी वापरली जाऊ शकते.
यासाठी व्यक्तीने किमान 3 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, गृहकर्ज हे राज्य सरकारकडे नोंदणीकृत वित्तीय संस्था, सार्वजनिक वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग हाउसिंग फायनान्स कंपन्या, राज्य गृहनिर्माण मंडळे आणि महानगरपालिका यांच्याकडून घेतले पाहिजे.
पीएफ कधी आणि किती काढता येईल
जर घर व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असेल किंवा त्याने संयुक्तपणे घर धारण केले असेल, तर पीएफ खातेदार गृहकर्जाच्या पेमेंटसाठी 90 टक्के रक्कम काढू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एखादी व्यक्ती ही रक्कम वारंवार काढू शकत नाही. गृहकर्जासाठी पीएफ काढण्याची सुविधा आयुष्यात एकदाच घेता येते.
सरकारला कर भरावा लागेल का?
गृहकर्जासाठी काढलेल्या पीएफ रकमेवर कर न भरण्याचा पहिला नियम म्हणजे पीएफ खाते उघडल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती काढली जावी. याआधी तुम्ही पीएफचे पैसे काढले तर ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ अंतर्गत कर भरावा लागेल. या अंतर्गत, EPF शिल्लकवर 10 टक्के दराने TDS (Tax Deducted at Source) कापला जातो.
पॅन कार्ड न दिल्याने कर
जर रोजगार सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल आणि पैसे काढताना पॅन कार्ड सादर केले नसेल तर 30 टक्के स्लॅब दराने टीडीएस कापला जाऊ शकतो. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या.
हे पण वाचा : Health Tips: तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर ‘ही’ 5 ड्रिंक्स घ्या होणार मोठा फायदा