Mutual Fund : तुम्ही देखील 2023 मध्ये भविष्यात लागणाऱ्या आर्थिक गरजांचा विचार करून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे.
आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याची माहिती तुम्हाला देणार आहोत.
तुम्ही या माहितीच्या आधारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून लाखो रुपयांचा फायदा घेऊ शकतात. चला मग जाणून घेऊया म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
म्युच्युअल फंड SIP कसे कार्य करते
एसआयपीची निवड करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या खात्यातून दर महिन्याला एक रक्कम कापली जाते. ही रक्कम दर महिन्याला एसआयपीमध्ये कापली जाणार आहे आणि खात्यातून पैसे कापण्याची तारीख आधीच निश्चित केलेली आहे.
दीर्घ कालावधीसाठी विविध योजनांमध्ये सरासरी SIP परतावा 12% प्रतिवर्ष आहे. येथे, लक्षात ठेवा की वार्षिक परतावा कमी किंवा जास्त असल्यास, त्याचा तुमच्या कॉर्पसवर परिणाम होऊ शकतो. परताव्याची हालचाल बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असते.
हे जाणून घ्या कि तुम्ही SIP मध्ये 100 रुपये दरमहाने देखील गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवण्याची गरज नसते.
गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा
कोणाचेही म्हणणे ऐकून घाईघाईने म्युच्युअल फंडात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. आधी त्याबद्दल जाणून घ्या. जर तुम्हाला याबद्दल काही माहिती नसेल तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.
म्युच्युअल फंडात अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करू नका. तुमच्या जाणकार लोकांना कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळाले असले तरी हे सर्वांसोबतच घडेलच असे नाही. तुम्ही किमान ५-७ वर्षे वेळ द्यावा, मग तुम्हाला भरपूर नफा मिळू शकेल. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे अनेक पर्याय मिळतात.
पूर्वी लोकांना मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधून चांगला नफा मिळत असे, परंतु प्रत्येक वेळी ते होईलच असे नाही. अशा प्रकारची गुंतवणूक टाळावी. तुम्ही नेहमी मल्टी कॅप, लार्ज कॅपमध्ये गुंतवणुकीची योजना करावी.
जेव्हा लोक बाजारात तेजी पाहतात तेव्हा ते गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने हे चांगले नाही कारण शेअर बाजार अप्रत्याशित आहे. यामध्ये बाजार वेगाने वाढतो, त्यानंतर दुप्पट वेगाने घसरतो. म्हणूनच अशी गुंतवणूक नेहमी टाळावी.