Mutual Fund : आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज एक भन्नाट फंडाबद्दल माहिती देणार आहोत. या फंडाने अनेक गुंतवणूकदारांना आतापर्यंत श्रीमंत केले आहे.
मागच्या वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना तब्बल 30% परतावा दिला आहे. या फंडाचा गेल्या 5 वर्षातील सरासरी परतावा 21% आहे.
28 वर्षांपूर्वी या फंडाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या 3 वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 31% परतावा दिला आहे.
मागील 5 वर्षांसाठी सरासरी परतावा 21% आहे आणि 15 वर्षांसाठी तो 15% आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्याला 1.39 लाख रुपये मिळाले असते.
3 वर्षात, ज्या व्यक्तीने 3.60 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याच्याकडे 5.61 लाख रुपये जमा झाले असतील. मात्र, सुरुवातीपासूनच त्यात गुंतवणूक करणाऱ्यांवर पैशांचा पाऊस पडला.
जर एखाद्याने 28 वर्षांपूर्वी त्याची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर आज त्याला 12 कोटी रुपये मिळाले असते. म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीच्या अधीन असतात हे लक्षात घ्या. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा.