Investment News : बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात करणार तब्बल 39 लाख कोटींची गुंतवणूक – वाचा सविस्तर

Investment News : पुढील 5 वर्षांत भारतात 475 अब्ज डॉलर (सुमारे 39 लाख कोटी) विदेशी थेट गुंतवणूक किंवा थेट विदेशी गुंतवणूक (FDI) येऊ शकते. CII-EY ने संयुक्त अहवालात याचा अंदाज वर्तवला आहे. ‘व्हिजन डेव्हलप्ड इंडिया: अपॉर्चुनिटीज अँड एक्स्पेक्टेशन्स फॉर – मल्टीनॅशनल कंपनीज (MNCs)’ असे या अहवालाचे नाव आहे. येत्या ५ वर्षांत आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करून भारत परदेशी गुंतवणुकीचा हा आकडा सहज गाठू शकेल, असे या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, 71 टक्के बहुराष्ट्रीय कंपन्या भारताला त्यांच्या जागतिक विस्तारासाठी आकर्षक गुंतवणूक ठिकाण मानतात. त्याच वेळी, 96 टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सांगितले की ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेबद्दल खूप सकारात्मक आहेत.

MNC ने GST प्रणाली लागू करणे, विविध क्षेत्रातील डिजिटायझेशनला चालना देणे आणि कर संबंधित बाबींमध्ये अधिक पारदर्शकता यासह विविध सुधारणांसाठी भारत सरकारचे कौतुक केले. या सर्वेक्षणानुसार, बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना असे वाटते की भारतीय अर्थव्यवस्था पुढील 3-5 वर्षांत खूप चांगली कामगिरी करेल.

CII-EY अहवालात म्हटले आहे की, “भारत सुधारणा आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करून पुढील 5 वर्षामध्ये US $ 475 अब्ज FDI मिळवण्याची संधी निर्माण करू शकतो.” गेल्या दशकात भारतात FDI मध्ये सातत्याने वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात ८४.८ अब्ज डॉलरची विक्रमी एफडीआय आली.

सुधीर कपाडिया, भागीदार (कर आणि नियामक सेवा). EY इंडिया म्हणाले, “भारताकडे जागतिक मूल्य साखळीतील एक उदयोन्मुख उत्पादन केंद्र, वाढती ग्राहक बाजारपेठ आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनातील जागतिक नेता म्हणून पाहिले जाते.”

सर्वेक्षणात म्हटले आहे की. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सरकारकडून ‘व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधा प्रकल्पांची जलद पूर्तता, वेगवान मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि जीएसटीमध्ये आवश्यक सुधारणा सुरू ठेवण्याची अपेक्षा केली आहे.