पैसापाणीMukesh Ambani :  'हा' स्टॉक मुकेश अंबानीच्या डीलने चमकला !  गुंतवणूकदार होणार...

Mukesh Ambani :  ‘हा’ स्टॉक मुकेश अंबानीच्या डीलने चमकला !  गुंतवणूकदार होणार मालामाल

Related

Share

Mukesh Ambani : तुम्ही देखील नवीन वर्षात शेअर बाजरात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट शेअरबद्दल माहिती देणार आहोत.

- Advertisement -

जे मागच्या पाच दिवसांपासून अपर सर्किटमध्ये दिसत आहे. तुम्ही देखील या शेअरमध्ये गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकतात. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला माहिती असेल कि 29 डिसेंबर रोजी मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेटमधील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

या वृत्तानंतर शेअर बाजारात लिस्टेड कंपनी लोटस चॉकलेटचा स्टॉक अपर सर्किटमध्ये असल्याचे दिसत आहे. स्टॉकमधील तेजी सलग 5 दिवस सुरू आहे.

शेअरची किंमत काय आहे

29 नोव्हेंबर रोजी बीएसई निर्देशांकावर लोटस चॉकलेटच्या शेअरची किंमत 117 रुपयांच्या पातळीवर होती. सततच्या अप्पर सर्किटमुळे 4 जानेवारीला शेअरची किंमत 142.25 रुपयांच्या पातळीवर होती.ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप रु. 175 कोटी आहे.

काय होती डील

वास्तविक, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने लोटस चॉकलेटच्या प्रवर्तकांसोबत करार केला आहे. लोटस चॉकलेट… चॉकलेट, कोको उत्पादने आणि कोको डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते. शेअर खरेदी करारांतर्गत, RCPL ने लोटस चॉकलेटच्या पेड-अप शेअर कॅपिटलपैकी 77 टक्के संपादन केले आहे.

हे पण वाचा :- Income Tax Saving:  टॅक्स वाचवून तुम्ही व्हाल श्रीमंत! फक्त ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या