Minimum Balance Rules: ‘या’ बँकांमध्ये खाते असेल तर ‘इतके’ पैसे खात्यात ठेवा नाहीतर भरावा लागेल दंड

Minimum Balance Rules:  आज ग्राहकांना बँका अनेक प्रकारचे सुविधा देत आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना देखील बँकांनी ठरवलेल्या काही नियमांचेही पालन करावे लागते.

या नियमांमध्ये सर्वात महत्वाचे नियम म्हणजे मिनिमम बॅलन्स राखणे. तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलन्स मर्यादा वेगळी असते जी ग्राहकांना राखावी लागते. जर एखाद्या ग्राहकाने खात्यानुसार किमान शिल्लक ठेवली नाही तर बँक त्या ग्राहकाकडून दंड वसूल करते.

खातेधारकांसाठी मिनिमम बॅलन्स नियम 

State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रदेशानुसार त्यांच्या खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स  ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 1,000 रुपये आहे. निमशहरी भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात 2,000 रुपये ठेवावे लागतील. तर मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3 हजार रुपये आहे.

HDFC Bank

एचडीएफसी बँकेतील सरासरी मिनिमम बॅलन्स  मर्यादा देखील निवासस्थानावर अवलंबून असते. ही मर्यादा शहरांमध्ये 10,000 रुपये, निमशहरी भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपये आहे.

ICICI Bank

ICICI बँकेने प्रदेशानुसार त्यांच्या खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. शहरी भागासाठी 10,000 रुपये, निमशहरी भागासाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये इतकी मर्यादा आहे.

हे पण वाचा : Weather Update: सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ; जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अपडेट