LIC Kanyadaan Policy: ‘या’ योजनेत गुंतवा तुमचे पैसे ! मुलीच्या लग्नाचे राहणार नाही कोणतेही टेन्शन ; जाणून घ्या फायदा

LIC Kanyadaan Policy: भविष्याचा विचार करून आज अनेक जण देशात सुरू असणाऱ्या विविध लहान बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

यातच जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या लग्नाची काळजी करून बचत करण्यासाठी एक खास योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे.

आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एलआयसीची ‘एलआयसी कन्यादान योजना’ बद्दल माहिती देणार आहोत जी तुमच्या मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

एलआयसी कन्यादान पॉलिसीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड.

उत्पन्न प्रमाणपत्र.

ओळखपत्र.

पत्त्याचा पुरावा.

पासपोर्ट साइट फोटो.

स्वाक्षरी केलेला अर्ज.

जन्म प्रमाणपत्र .

पहिल्या प्रीमियमसाठी धनादेश किंवा रोख रक्कम द्यावी लागेल.

22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल

या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी काही अटी आहेत, उदाहरणार्थ, तुमचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय 1 वर्ष असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे, परंतु प्रीमियम 22 वर्षांसाठी भरावा लागेल.

पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मध्येच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील या पॉलिसीसाठी, तुम्हाला दररोज 121 रुपये वाचवावे लागतील, म्हणजेच मासिक प्रीमियम सुमारे 3600 रुपये आहे, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमी प्रीमियम देखील घेऊ शकता.

तथापि, प्रीमियमची रक्कम कमी झाल्यास, पॉलिसीची रक्कम देखील कमी होईल. दररोज 121 रुपये गुंतवल्यास 25 वर्षांनी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील.

 हे पण वाचा :  Splendor Plus Offers : या महागाईत होणार मोठी बचत ! फक्त 21,200 मध्ये घरी आणा ‘ही’ चमकदार बाइक ; पहा संपूर्ण ऑफर