Share Market News : या स्टील कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची दिवाळी धडाक्यात! दिला तब्बल 140% रिटर्न्स

Share Market News : नारायणी स्टील्स लिमिटेड ही पोलाद क्षेत्रात व्यवहार करणारी रु. 42.44 कोटी बाजारमूल्य असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनी रौबार, एमएस ग्रेड अँगल, फ्लॅट, स्क्वेअर, गोल, वायर रॉड कॉइल इत्यादी विविध आकारांचे उत्पादन करते. गेल्या एक महिन्यापासून नारायणी स्टीलच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या काळात त्यांनी गुंतवणूकदारांना सुमारे 140 टक्के इतका बहुबॅगर परतावा दिला आहे.

नारायणी स्टील्सचा शेअर शुक्रवार, 14 ऑक्टोबर रोजी बीएसईवर 4.99 टक्क्यांनी वाढून 38.95 रुपयांवर बंद झाला. हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीचे शेअर्स सतत वरच्या सर्किटमध्ये दिसत आहेत, ज्यामुळे त्याच्या किमतीत मोठी उसळी आली आहे.

गेल्या एका आठवड्यात त्याचे शेअर्स 21.34 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 138.81 टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने नारायणी स्टीलच्या शेअर्समध्ये फक्त एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक आत्तापर्यंत ठेवली असती तर त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य आज 2.40 रुपये झाले असते. म्हणजेच गेल्या एका महिन्यात त्याला 1.40 लाख रुपयांचा नफा झाला असेल.

नारायणी स्टीलने 2022 च्या सुरुवातीपासून आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 215.13 टक्के परतावा दिला आहे. तथापि, सप्टेंबर 2021 मध्ये BSE वर सूचीबद्ध झाल्यापासून, त्याचे शेअर्स आतापर्यंत केवळ 22 टक्क्यांनी वाढले आहेत..

कंपनीच्या आर्थिक आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1.30 कोटी रुपये होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 9.72 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. जून तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 198.25 टक्क्यांनी वाढून 5.10 कोटी रुपये झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1.71 कोटी रुपये होती.