Indian Railways: आता तिकीट नसतानाही करता येणार ट्रेनमध्ये प्रवास ! रेल्वेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Indian Railways: आज भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील तब्बल लाखो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करतात.

याचा मुख्य करणार म्हणजे रेल्वेमध्ये मिळणारे अप्रतिम सुविधा होय. प्रवाशांना रेल्वेमध्ये आरामदायी आणि किफायतशीर प्रवास मिळतो. यातच आता भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय घेत प्रवाशांना खूशखबर दिली आहे. ज्यामुळे देशातील लाखो नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे.

हरिद्वार-डेहराडून मार्गावरून जाणाऱ्या दोन गाड्यांमध्ये वेटिंग किंवा आरएसी तिकीट असल्यास, प्रवाशांना ट्रेनमध्ये टीटीई कडे फिरावे लागणार नाही किंवा त्यांना रिकाम्या जागांची चिंता करावी लागणार नाही.

हरिद्वार-डेहराडून रेल्वे मार्गावर काठगोदाम एक्सप्रेस आणि नैनी जन शताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. हरिद्वार रेल्वे स्थानकावर 15 मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यासाठी टीटीईला प्रशिक्षणही देण्यात आले आहे.आता तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून तुमचे तिकीट बनवू शकता.पेटीएमद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येईल. रेल्वेने सीट आरक्षणाशी संबंधित चार्ट आणि पेपर वर्क काढून टीटीईला टॅब दिला आहे.

टॅबला रेल्वे सर्व्हर आणि इंटरनेटच्या मदतीने टीटीई चालवण्यास सांगण्यात आले आहे. टॅबला मुख्य सर्व्हरसह देखील एकत्रित केले गेले आहे जे रेल्वेची पीआरएस आणि तिकीट माहिती प्रदान करते.

 हे पण वाचा : Laxmi Mata: ‘या’ 5 गोष्टी तुमच्या घरी असतील तर तुम्हाला मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद ; होणार ‘ते’ स्वप्न पूर्ण