Indian Economy : 2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था गाठू शकते हा महत्वाचा टप्पा!

Indian Economy : भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, मॉर्गन स्टॅनलीने आपल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. मॉर्गन स्टॅन्ले म्हणाले की, भारताचा GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन) सध्या सुमारे $34 ट्रिलियन आहे. जो पुढील 10 वर्षात $85 ट्रिलियनपर्यंत वाढू शकतो. अहवालात असे म्हटले आहे की भारताच्या जीडीपीचा आकार दरवर्षी सुमारे $ 400 अब्जने वाढत आहे. अमेरिका आणि चीन वगळता संपूर्ण जगात इतर कोणत्याही देशाचा जीडीपी सध्या इतका वाढत नाहीये.

मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, पुढील 7 वर्षांत म्हणजेच 2030 पूर्वी भारताचा GDP सुमारे 53 ट्रिलियनने वाढून $65 ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकतो.

अहवालात असे म्हटले आहे की भारतातील कार्यरत वयाची लोकसंख्या अजूनही वाढत आहे, जी भारताची दीर्घकालीन वाढ दर्शवेल… याउलट चीनच्या लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे, याचा अर्थ चीनला आपली वाढ करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.

भारतातील लोक चीनपेक्षा सरासरी 11 वर्षांनी लहान आहेत.

तसेच, चीनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे कारखाने तेथून हलवावे लागू शकतात, ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. भारतातील लोकांचे सरासरी वय सध्या चीनच्या लोकांपेक्षा 11 वर्षे कमी आहे.

भारताचा वास्तविक GDP पुढील दशकात सरासरी ६.५% दराने वाढेल

मॉर्गन स्टॅन्ले यांनी पुढील दशकात भारताचा वास्तविक जीडीपी सरासरी 6.5 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, या कालावधीत चीनची वाढ सरासरी 3.6 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. भारत सरकार गेल्या काही काळापासून रस्ते आणि रेल्वे ज्यासह पायाभूत सुविधांवर भर देत आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होऊ शकतो.