EPFO Alert: सावधान! एका चुकीमुळे तुमचे खाते होईल रिकामे ; नेहमी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..

EPFO Alert:  मागच्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ग्राहकांना  इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन फसवणूक होत असल्याची माहिती ईपीएफओने दिली आहे.
ईपीएफओने ट्विट केले की, जर स्वत:ला संस्थेचा सदस्य म्हणून  विचारणाऱ्या व्यक्तीने तुमच्या खात्याशी संबंधित किंवा अन्य गोपनीय माहिती विचारली तर ती अजिबात देऊ नका.

हे ध्यानात ठेवा
ईपीएफओने सांगितले की, संस्था ग्राहकांना फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाद्वारे आधार, पॅन, यूएएन, बँक खाते किंवा ओटीपी यांसारखे तपशील विचारत नाही. तसेच EPFO ​​ने सब्सक्राइबर कसे सुरक्षित राहू शकतात हे सांगितले.

लोभ हे फसवणुकीचे कारण बनते
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आपल्या सदस्यांना ऑनलाइन फसवणुकीच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी चेतावणी दिली आहे आणि बचावाच्या टिप्स देखील दिल्या आहेत.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत EPFO ​​ने आपल्या सदस्यांना ‘फेक कॉल्स/मेसेजपासून सावध राहण्यास’ सांगितले आहे. लोभाच्या जाळ्यात अडकू नका अशी माहिती  EPFO ने दिली आहे.

माहिती शेअर करू नका
EPFO ने आपल्या सदस्यांना UAN/पासवर्ड/PAN/आधार सारखी महत्वाची माहिती कोणासोबतही शेअर करू नये असा इशारा दिला आहे.

ईपीएफओ सदस्यांनी हे तपशील फोन किंवा सोशल मीडियावर कोणाशीही शेअर करू नये जरी इतर पक्षाने ईपीएफओचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला असला तरीही तुम्ही माहिती शेअर करू नका.

हे पण वाचा : Business Idea: मेहनती लोकांसाठी बेस्ट आहे ‘हा’ व्यवसाय ! दरमहा होणार हजारोंची कमाई