Education Loan: शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी ‘या’ बँकांमध्ये करा अर्ज ; नाममात्र व्याजदराने मिळेल लाखो रुपयांचे कर्ज

Education Loan: आज आपल्या देशातील अनेकजण आहे ज्यांना त्यांचा उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावा लागतो मात्र आज सहज कर्ज मिळत नाही आणि मिळाला तर जास्त व्याज दराने हा कर्ज मिळतो.

यातच तुम्ही देखील एज्युकेशन लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या बँकांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण येथे तुम्ही 20 लाखांपर्यंतचे कर्ज सहजपणे घेऊ शकता. या बँकांद्वारे तुमच्याकडून अत्यंत कमी व्याजदर आकारले जातील. कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट असणे आवश्यक आहे.

याशिवाय उत्तीर्ण प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. तुम्ही ज्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. तेथे प्रवेश पत्र, फी स्ट्रक्चर आणि अर्जदाराचे केआयसी कागदपत्रे देखील आवश्यक असतील.

या बँका तुम्हाला स्वस्त शैक्षणिक कर्ज देत आहेत

State Bank of India

जर तुम्ही सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज शोधत असाल, तर तुम्ही एकदा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्या. येथे तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. येथे तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता. पंजाब बँक शैक्षणिक कर्जासाठी 7.15 टक्के व्याज आकारत आहे. तथापि, हा व्याजदर वेळोवेळी बदलत राहतो. या बँकेतून तुम्ही सात वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

Bank of Baroda

बँक ऑफ बडोदा ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देना बँक आणि विजया बँक या बँकेतच विलीन करण्यात आली आहे. येथूनही तुम्ही सहजपणे शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

ही बँक 7.15 टक्के व्याजही आकारत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो रेट बदलला की सर्व बँका कर्जावरील व्याजदरातही बदल करतात. या बँकेत अर्ज करून तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळवू शकता.

 हे पण वाचा :  Soybean Prices : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ ! राज्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या नवीन दर