Farming business idea : काकडीच्या लागवडीने बदलले त्याचे जीवनमान! वर्षभरात कमावले 15 लाख

Farming business idea : आपला स्वतःचा एखादा व्यवसाय असावा अस अनेकांचे मत असते. यासाठी कित्येक जण प्रयत्न करतं असतात. माञ यात सर्वात मोठी अडचण ही पैसे उभारणीची असते.

दरम्यान देशातील अनेक शेतकरी आता गहु, धान, डाळी, तेलबिया या पारंपरिक शेतीऐवजी नवीन पिके घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकन्यांनी नवीन शेती करून आपले उत्पन्न वाढवण्यात यशही मिळवले आहे. देशातील अनेक भागातील शेतकरी हायड्रोपोनिक शेती करत आहेत, तर अनेक भागातील शेतकरी पारंपारिक पिकाऐवजी भाजीपाला आणि फळांची लागवड करू लागले आहेत, ज्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळत आहेत.

राजस्थानातील नागौर येथे राहणारा रामनिवास पॉलिहाऊस तंत्रज्ञानाने शेती करतो. रामनिवास आपल्या शेतात काकडीची लागवड करतात. बाजारात चालणाच्या काकडीच्या किमतीवर त्यांचा नफा अवलंबून असतो. ते वर्षातून दोन ते तीन वेळा काकडीची लागवड करतात, ज्यातून त्यांना 14-15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयी वाढलेली जागरूकता आता त्यांना पारंपारिक शेतीपासून वेगळे करत आहे. पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये काकडी आणि मिरचीच्या लागवडीतून रामनिवास भरघोस कमाई करत आहेत.

एका वर्षात तीन पिके

राम निवास यांनी सांगितले की 1 एकरमध्ये काकडीच्या बियाण्याची किंमत 70000 च्या जवळपास येते. शेतात नांगरणी करून पिकाची कापणी करण्यासाठी ₹300000 पर्यंत खर्च येतो. काकडीचे पीक एका हंगामात ४ महिन्यांत काढणीसाठी तयार होते. काकडीचे एकरात 400 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि 800000 रुपये नफा मिळतो.

काकडीचा प्रभाव

यावर्षी ऑक्टोबरमध्ये काकडी ₹ 40 किलोपर्यंत विकली जात आहे, ज्यामुळे भरपूर नफा मिळत आहे. काकडीची किंमत 15 ते 20 रुपये प्रतिकिलो असेल, तर राम निवासचे फारसे नुकसान होत नाही. रामनिवास वर्षातून तीनदा काकडीचे पीक घेतात, त्यासोबतच तो हिरवी मिरची देखील पिकवतो, ज्यातून त्याला वर्षभरात 15 लाखांपर्यंत कमाई होते.

अनेक खर्चातून सुटका

रामनिवास यांच्या मते काकडीच्या लागवडीसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, काकडी ३ ते ४ महिन्यांत उत्पादन देऊ लागते, काकडीचे बियाणे पेरण्यासाठी मजुरांना काम करावे लागत नाही, त्यामुळे अनेक खर्चातून त्यांची सुटका होते.

सेंद्रिय खताचा फायदा

रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताच्या वापरामुळे रामनिवास यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे रामनिवास यांनी सांगितले,

पॉलीहाऊस खर्च

पॉलीहाऊस शेडनेट बसवण्यासाठी 20 लाख रुपये खर्च येतो. सरकार प्रत्येक जिल्ह्याचे टार्गेट ठरवते. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात 25 शेतकऱ्यांना पॉलीहाऊसवर अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तेवढ्याच शेतक-यांना शेडनेटवर अनुदान मिळते.