पैसापाणीBank UPI Limit: कामाची बातमी ! देशातील 6 मोठ्या बँकांनी सांगितली UPI...

Bank UPI Limit: कामाची बातमी ! देशातील 6 मोठ्या बँकांनी सांगितली UPI लिमिट ; जाणून घ्या रोज किती व्यवहार होणार ?

Related

Share

Bank UPI Limit: आपल्या देशात आज स्मार्टफोन वापरणार प्रत्येक नागरिक UPI चा वापर करून दररोज हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे.

- Advertisement -

तुम्ही देखील UPI च्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता काही बँकांनी  UPI व्यवहारांनावर काही मर्यादा लागू केली आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये देशातील काही मोठ्या आणि प्रमुख बँकांच्या UPI मर्यादेबद्दल सांगणार आहोत.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

UPI द्वारे एका दिवसात पैसे पाठवण्याची मर्यादा किती आहे?

UPI द्वारे, वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यातून दिवसातून सुमारे 10 वेळा पैसे पाठवू शकतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. भारतातील काही मोठ्या बँका आहेत ज्यांनी UPI ट्रान्झॅक्शन लिमिटबद्दल सांगितले आहे.

व्यवहार मर्यादा म्हणजे एका वेळी केलेले व्यवहार आणि दैनंदिन मर्यादा म्हणजे दिवसभरात केलेले व्यवहार. या काही बँका आहेत ज्यांच्या व्यवहार मर्यादा स्वतंत्रपणे नमूद केल्या आहेत.

बँक UPI मर्यादा येथे जाणून घ्या

State Bank Of India – भारतातील सर्वात मोठ्या बँकेची UPI व्यवहार मर्यादा रु 1 लाख आहे. याशिवाय, त्याची दैनंदिन व्यवहार मर्यादा देखील केवळ 1 लाख रुपये आहे.

Punjab National Bank – तिची व्यवहार मर्यादा रु 25,000 आहे. तर दैनिक UPI मर्यादा 50,000 रुपये निश्चित केली आहे.

ICICI Bank – UPI व्यवहार मर्यादा आणि या बँकेची दैनंदिन मर्यादा देखील 10,000-10,000 रुपये आहे. तथापि, या दोन्ही मर्यादा Google Pay वापरकर्त्यांसाठी 25,000 रुपये आहेत.

Bank Of India – तिची UPI व्यवहार मर्यादा आणि दैनंदिन मर्यादा देखील 1-1 लाख रुपये निश्चित केली आहे.

Axis Bank – UPI व्यवहार मर्यादा आणि Axis बँकेची दैनिक मर्यादा रु 1-1 लाख आहे.

HDFC Bank – खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने UPI व्यवहार आणि दैनंदिन मर्यादा रु. 1-1 लाख इतकी ठेवली आहे. तथापि, एक नवीन ग्राहक पहिल्या 24 तासांत फक्त रु 5,000 व्यवहार करू शकेल.

हे पण वाचा : Income With Old Note: 5 रुपयांची ‘ही’ नोट आता घरी बसून कमवून देणार लाखो रुपये ; जाणून घ्या कसा होणार फायदा