Share Market News : 23 वर्षांत तब्बल 2,85,000% रिटर्न्स; शेअर्सची धमाकेदार कहाणी घ्या जाणून

Share Market News : दरवर्षी दिवाळीला शेअर बाजार संध्याकाळी सुमारे एक तास व्यवहारासाठी खुला असतो. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. यावेळी व्यापार करणे शुभ असते. अशी ट्रेडर्सची धारणा आहे. म्हणूनच ते या काळात सक्रियपणे सहभागी होतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या मते, दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग दरम्यान आयशर मोटर्सचे शेअर्स खरेदीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

ICICI डायरेक्टने आयशर मोटर्सवर 4.170 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी कॉल केला आहे. ब्रोकरेजने सांगितले की गुंतवणूकदार पोझिशन्स घेऊ शकतात, म्हणजे, या स्टॉकमध्ये 3300-3480 रुपयांच्या दरम्यान खरेदी करू शकतात. आयशर मोटर्सचा शेअर आज NSE वर 3,487 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, ब्रोकरेजला सध्याच्या पातळीपेक्षा स्टॉक सुमारे 20 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

अधिक जाणून घ्या

ब्रोकरेज सांगितले की, नजीकच्या भविष्यात कमीत कमी जोखीम, प्रीमियम मोटारसायकलसाठी ग्राहकांची पसंती आणि हंटर 350 चे चांगले यश यासह आयशर मोटर्सने FY22-24 मध्ये 25 टक्के CAGR ने वाढ करणे अपेक्षित आहे.

95.37 हजार कोटी रुपयांसह आयशर मोटर्स देशातील तिसरी सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल कंपनी आहे. याच्या वर फक्त मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी आहे. आयशर मोटर्सकडे रॉयल एनफिल्ड सारखा मजबूत ब्रँड आहे. जो 250cc मोटारसायकल सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. याशिवाय कंपनी ट्रॅक्टरचे उत्पादनही करते.

आयशर मोटर्सच्या शेअर्सनी गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी जेव्हा आयशर मोटर्सच्या शेअर्सने पहिल्यांदा NSE वर व्यापार सुरू केला तेव्हा त्याची प्रभावी किंमत फक्त 1.22 रुपये होती, जी आज 3,487.00 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या 23 वर्षांत या शेअरच्या किमतीत 285,719.67 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज 23 वर्षांपूर्वी आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती तर त्यांचे 1 लाख रुपये आज 28.58 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या स्टॉकमध्ये केवळ 3,500 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते.

पहिल्या सहामाहीत विक्री 60% वाढली

आयशर मोटर्सचे रॉयल एनफिल्ड चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर 2023) 60 टक्क्यांनी वाढून 3,94,969 युनिट्सवर पोहोचले जे मागील आर्थिक वर्षाच्या समान सहामाहीत 2,47,067 युनिट्स होते.

या व्यतिरिक्त, कंपनीचा व्होल्वो ग्रुपसोबतचा संयुक्त उपक्रम, कंपनीचा संयुक्त उपक्रम VE कमर्शियल व्हेइकल्सची विक्री या कालावधीत 67.6% वाढून 35,085 युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 20,940 युनिट्स होती. आयसीआयसीआय डायरेक्ट कंपनीने आपली मजबूत विक्री कामगिरी पुढे चालू ठेवण्याची अपेक्षा केली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग

24 ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी ‘मुहूर्त ट्रेडिंग साठी शेअर बाजार खुला होणार आहे. बीएसई आणि एनएसईनेही यासंदर्भात नोटीस बजावली आहे. नोटीसनुसार, शेअर बाजार 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.15 ते 7:15 या वेळेत खुला असेल.