Alert Malware App: चुकूनही ‘हे’ धोकादायक अॅप डाउनलोड करू नका नाहीतर होऊ शकते बँक खाते रिकामे

Alert Malware App: आज आपण स्मार्टफोनच्या मदतीने घरी बसून एकाच वेळी अनेक काम करू शकतात. घरीबसुन स्मार्टफोनच्या मदतीने हजारो रुपयांचे व्यवहार देखील आपण सहज करू शकतात.

मात्र कधी कधी एक चूक बँक खाते देखील रिकामे करू शकते हे तुम्हाला माहिती असेल. आपला स्मार्टफोन व्हायरसमुळे असुरक्षित देखील होऊ शकते.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ताज्या अहवालानुसार 203 मोबाईल अॅप्समध्ये धोकादायक व्हायरस असण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन अॅप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगावी .

या अॅप्सची ओळख पटल्यानंतर त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे अॅप तुमच्या बँकिंग तपशिलातही खोडा घालत आहे. रिपोर्टनुसार हे अॅप धोकादायक मालवेअर व्हायरस घेऊन स्मार्टफोनची वैयक्तिक माहिती चोरत आहे. हे अॅप्स केवळ तुमचा वैयक्तिक डेटाच चोरत नाहीत तर तुमचे बँकिंग तपशीलही हॅक करत आहेत.

नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी आणि थायलंडच्या डिजिटल इकॉनॉमी आणि सोसायटी मंत्रालयाला 203 मालवेअर अॅप सापडले आहेत जे Android स्मार्टफोन वापरकर्त्यांचा डेटा चोरत आहेत. गुगलनेही यापैकी बहुतांश अॅप्स आपल्या प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या अॅप्सची यादीही जारी केली आहे.

अलर्ट मालवेअर अॅप म्हणजे काय

भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी Cert-In ने या बँकिंग मालवेअर Sova बद्दल Android वापरकर्त्यांना अलर्ट केले होते.

कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने अॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे टाळा. धोकादायक अॅप्समध्ये 4K Pro Camera, 4K Wallpapers Auto Charger, Advanced SMS, All Photo Translator, Beauty Filter, Blood Pressure Checker इत्यादी अॅप आहे.

तुमच्या Android स्मार्टफोनवर कोणतेही थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची सर्व सुरक्षा तपासा. जर तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा जास्त प्रमाणात वापरला जात असेल तर तुमच्या फोनमध्ये मालवेअर असण्याची दाट शक्यता आहे. संरक्षणासाठी वापरकर्त्यांना त्यांचे फोन नवीनतम सॉफ्टवेअर आणि अॅप्सवर अपडेट करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :  Weather Update: नागरिकांनो लक्ष द्या ! ‘या’ राज्यात पुन्हा होणार पावसाची एन्ट्री ; जाणून घ्या देशभरातील हवामानाची स्थिती