Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Aadhaar Card : आता घरबसल्या करा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Card : आज देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि इतर सरकारी कामे करण्यासाठी तसेच इतर कामे करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आज आधार कार्ड इतर कागदपत्रांसोबत लिंक करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. तुमची कोणी फसवणूक करू नये यासाठी हे आवश्यक करण्यात आले आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

तुम्हाला हे माहिती असेल कि आज जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक न केल्यास अनेक सुविधांपासून तुम्हाला वंचित राहावे लागू शकते. जर तुम्ही देखील मोबाईल क्रमांकासह आधार कार्ड लिंक केले नसेल तर आज आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत जे तुम्ही घरी बसून देखील करू शकतात. चला मग जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासा

सर्व प्रथम UIDAI वेबसाइटवर जा आणि ‘आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा’ वर क्लिक करा. आता तुम्ही बँक मॅपर पेजवर याल. तुम्ही resident.uidai.gov.in/bank-mapper या थेट लिंकलाही भेट देऊ शकता.

यानंतर UID/VID, सुरक्षा कोड टाका आणि ‘OTP पाठवा’ वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या UIDAI कडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो एंटर करा आणि लॉगिन वर क्लिक करा.

aadhaar

बँक खात्याशी आधार लिंक

करण्याबाबतची माहिती तुमच्या समोर येईल. मोबाईल नंबर देखील लिंक करू शकता बँक खात्याच्या आधार लिंकिंगची स्थिती मोबाईलवरूनही तपासता येते. मात्र, यासाठी तुम्ही आधार क्रमांकावर नोंदणी केली पाहिजे.

सर्व प्रथम UIDAI कडे नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवरून 9999*1# डायल करा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक पुन्हा प्रविष्ट करा आणि ‘Send’ वर क्लिक करा.

जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक असेल तर त्याची माहिती डिस्प्लेवर दिसेल. जर डिस्प्लेवर काहीही आले नाही तर असे होऊ शकते की खाते आधारशी लिंक केलेले नाही.

 हे पण वाचा : Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये मिळेल 7-8 टक्के व्याज ; जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती असणार बेस्ट