Share Market tips : पोर्टफोलिओमध्ये येऊ शकते 43% उभारी! हा फार्मा कंपनीचा स्टॉक खरेदी कराच! 

Share Market tips : आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगला नफा देणारे स्टॉक असायला हवेत असं प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटत असत. यासाठी प्रत्येकजण विवीध स्टॉकची माहिती घेत असतो. जेणेकरून नफा देणारा स्टॉक आपल्याला फायदा मिळवून देईल.

दरम्यान आज आम्ही असाच फायदा देणारा स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा स्टॉक फार्मा सेक्टर मधील आहे. आणि सदर स्टॉक गुंतवणूकदारांना तब्बल 43% रिटर्न्स देऊ शकतो. चला तर स्टॉक बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने पिरामल फार्मा समभागांना खरेदी रेटिंगसह कव्हर करण्यास सुरुवात केली आहे. पिरामल फार्मा गेल्या महिन्यातच पिरामल एंटरप्रायझेसमधून डिमर्ज झाला आहे आणि शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की पिरामल फार्माने सप्टेंबर तिमाहीत सर्व विभागांमध्ये मजबूत वाढ नोंदवली.

त्याचा महसूल वार्षिक आधारावर 9 टक्के आणि तिमाही आधारावर 16 टक्के वाढून 17.2 रुपये झाला आहे. सीडीएमओ विभाग देखील वार्षिक आधारावर 6.1% वाढला. कॉम्प्लेक्स हॉस्पिटल जेनेरिक (CHG) मध्ये 12.4% वार्षिक वाढ झाली आणि ग्राहक आरोग्य सेवा (OTC) विभाग 18.2% वाढला.

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, CDMO विभागातील कमी विक्रीमुळे पिरामल फार्माचे ऑपरेटिंग मार्जिन 10.0% इतके आहे. ICICI सिक्युरिटीजने सांगितले की, “विकास सेवांची वाढती गरज, विशेषतः नवीन औषधांसाठी, जटिल नियामक प्रक्रिया, या क्षेत्रातील उच्च प्रवेश खर्च, जटिल हॉस्पिटल जेनेरिकमधील मर्यादित स्पर्धा लक्षात घेता, आम्हाला पिरामल फार्माच्या व्यवसायात रस आहे.”

दरम्यान, सोमवारी, 14 नोव्हेंबर रोजी पिरामल फार्मा शेअर्स NSE वर 1.21 टक्क्यांनी घसरून 139.00 रुपयांवर बंद झाले. अशा प्रकारे, आयसीआयसीआय सिक्युरिटीजला सध्याच्या पातळीपासून पिरामल फार्माच्या शेअर्समध्ये सुमारे 43.37 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

मोतीलाल ओसवाल यांचे स्टॉकबाबत काय मत आहे?

मोतीलाल ओसवाल यांचा अंदाज आहे की CDMO महसूल 10 टक्के (कम्पाऊंड वार्षिक वाढीचा दर ), CHG महसूल 12 टक्के आणि ICH महसूल 22 टक्के CAGRने आर्थिक वर्ष 2022 2024 पर्यंत वाढू शकतो. अशा स्थितीत, ब्रोकरेज फर्मने गेल्या महिन्यात एका अहवालात 210 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

कंपनी बद्दल

पिरामल फार्मा कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग (CDMO), कॉम्प्लेक्स हॉस्पिटल जेनेरिक्स (CHG) आणि इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स (ICH) विभागात काम करते. यामध्ये, FY22 मध्ये एकूण विक्रीत CDMO चा वाटा 59 टक्के, CHG चा वाटा 30 टक्के आणि ICH चा वाटा 11 टक्के आहे..