Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून किलोभर सोन्याचे दागिने घालून पुण्यातील एक तरुण अनेक ठिकाणी मिरवताना दिसतो. त्यामुळेच त्याला गोल्डमॅन सनी वाघचौरे नावाने ओळखलं जाऊ लागलं.

यातूनच तो बॉलिवूडच्या अनेक कलाकारांशी जवळीक साधू शकला. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून तो घराघरात ही पोहचला. ही एक बाजू सर्वश्रुत आहे.मात्र दुसरी बाजू ही धक्कादायक असून सनीचा काळा चेहरा समोर आणणारी आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या आणि अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या

सनी वाघचौरेने गृहोपयोगी वस्तूंसाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा ही दाखल झालाय, त्यात सासू-सासरे आणि नंदेचा ही समावेश आहे. त्यामुळे गोल्डमॅन म्हणून राज्यात परिचित असणाऱ्या सनीला कधीही अटक होऊ शकते.

सनीवर गुन्हा दाखल करणारी ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सनी जे दागिने घालून मिरवतोय त्यापैकी अनेक दागिने हे पहिल्या पत्नीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. सोन्याच्या दागिने दाखवून त्याने काही महिलांना जाळ्यात खेचलंय. दुसऱ्या पत्नी सोबत राहत असतानाच

तो तिसऱ्या महिलेला घरी घेऊन यायचा. कुटुंबियांच्या देखतच हे सुरू असताना पत्नी वगळता कोणीच आक्षेप घेतला नाही. हे सर्व असह्य झाल्यानंतर एप्रिल 2020 मध्ये त्या माहेरी आल्या. दरम्यानच्या काळात प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाले, पण तोडगा निघालाच नाही. शेवटी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नी गर्भवती असताना गर्भपाताची औषधं देऊन गर्भपात केल्याचा, तसेच मारहाण, शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक छळ केला.

असा गुन्हा ही पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने दाखल केलाय. 2011 पासून सुरू असलेल्या या छळात सासू, सासरे आणि नंदेने ही मदत केल्याचं गुन्ह्यात नमूद आहे. दरम्यान, बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन फिर्यादीस मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचे औषध देऊन गर्भपात केला, असं फिर्यादीत पीडित पत्नीने म्हटले आहे. पीडित महिलेने आरोप केला आहे की, २३ मार्च २०११ पासून आतापर्यंत (२२ ऑक्टोबर २०२०) आपला छळ केला जात होता.

या काळात माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचंही पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सनी वाघचौरे (३१ वर्षे), सासू आशा वाघचौरे (वय ५५ वर्षे), सासरे नाना वाघचौरे (वय ६० वर्षे), नणंद निता या चौघांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात २६२/२०२० भा.द.वि. क. ४९८ (अ), ३१३, ५०४, ३३६, २९२, ३४ कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सनी वाघचौरे याला पूर्वी फार कोणी ओळखत नव्हते. मात्र, अंगावर सोन्याचे दागिने घालून तो खूपच प्रसिद्ध झाला. त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की बॉलिवूड कलाकालांसोबतही त्याचे फोटोज येऊ लागले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology