Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :-उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे खरीप आणि रब्बीचे पीक वाहून गेली आहे. याचा आढावा घेण्यासाठी आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेले आहेत.

मात्र जिल्ह्यातील प्रत्येक भागाची परिस्थिती ही वेगळी आहे, पैश्यांचा नियोजन नाही,अद्याप नुकसानीचा आकडा आलेला नाही, त्यामुळे ज्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी करणं शक्य नाही

त्याचप्रमाणे सरसकट ओला दुष्काळ ही जाहीर करता येणार नसल्याचे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology