MHLive24 टीम, 29 जानेवारी 2022 :- बँक ऑफ इंडिया (BoI) सध्या भरपूर चर्चेत आहे. बँकेने 23 जानेवारी रोजी ट्विट करून माहिती दिली होती की सध्या ते आपली कोअर बँकिंग प्रणाली (CBS) अपग्रेड करत आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाची ऑनलाइन सिस्टम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प होती.(Bank of India Server Down)

अजूनही ट्विटरवर गेल्या 4 दिवसांपासून बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सतत ट्विट करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. इतके दिवस होऊनही बँकेच्या ग्राहकांना समस्या येत आहेत.

23 जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये बँकेने म्हटले आहे की त्यांनी 21 जानेवारीपासून ग्राहकांचा डेटा नवीन प्रणालीमध्ये हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे आणि ही प्रक्रिया 24 जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाईल.

मात्र, 24 जानेवारीनंतरही अनेक ग्राहकांनी बँकेची ऑनलाइन प्रणाली डाउन असल्याच्या तक्रारी केल्या. विशेषतः ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर.

ट्विटरवर, ग्राहकांनी बँकेच्या वेबसाइटवर नेट बँकिंग, चेक क्लिअरन्स, वारंवार होणारे व्यवहार यासह अनेक तक्रारी नोंदवल्या.

BoI सूत्रांनी सांगितले की अपग्रेडमुळे काही “किरकोळ त्रुटी” मुळे ग्राहकांना अडचणी आल्या. मात्र, आता सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून, आता ऑनलाइन यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे.

दरम्यान, शुक्रवारी बँक ऑफ इंडियाचा शेअर NSE वर 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 55.25 रुपयांवर बंद झाला.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup