Maruti Suzuki
Maruti Suzuki

MHLive24 टीम, 02 एप्रिल 2022 :- Maruti suzuki : सध्या ऑटो सेक्टरमध्ये अनेक कंपन्यांची तुंबळ स्पर्धा सुरू आहे. आपल्या वाहनांची विक्री अधिक प्रमाणात व्हावी तसेच आपल्या महसुलात आणि नफ्यात वाढ होईल याकरिता अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करून घेत घेत आहेत. कंपन्यांकडून याकरिता विविध ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. अशातच मारूती सुझुकीच्या काही कार नविन फिचर्स सह येत आहेत.

सुरक्षितता लक्षात घेऊन मारुती सुझुकी या वर्षी आपल्या सर्व आगामी कार अनेक आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉन्च करणार आहे. भारत सरकारने अलीकडेच सर्व वाहनांसाठी 6 एअरबॅग्ज अनिवार्य केल्या आहेत आणि आता हे लक्षात घेऊन कंपनी 6 एअरबॅग्ज तसेच त्यांच्या आगामी सर्व कारमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देऊ शकते.

मारुती सुझुकी सियाझ:

आता तुम्हाला Maruti Suzuki Ciaz मध्ये 6 एअरबॅग बघायला मिळतील. कंपनी या कारमध्ये अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स देखील देईल, ज्यामुळे ही प्रीमियम सेडान आणखी सुरक्षित होईल. सध्या, त्याच्या प्रतिस्पर्धी Hyundai Verna, Honda City आणि Skoda Slavia कडे आधीच 6 airbags आहेत.

मारुती सुझुकी विटारा ब्रीझ:

कंपनी एप्रिल महिन्यात आपली आलिशान SUV Maruti Suzuki Vitara Brezza चे फेसलिफ्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या आगामी फेसलिफ्ट आवृत्तीमध्ये 6 एअरबॅग प्रदान करेल. सध्या ती बाजारात Kia Sonet, Hyundai Venue आणि Mahindra XUV300 शी स्पर्धा करते.

मारुती सुझुकी एस-क्रॉस फेसलिफ्ट आवृत्ती:

कंपनीने आपली मारुती सुझुकी एस-क्रॉस फेसलिफ्ट आवृत्ती ब्रिटीश बाजारात आधीच लॉन्च केली आहे आणि ती या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला अनेक सेफ्टी फीचर्ससह 6 एअरबॅग पाहायला मिळतील.

मारुती सुझुकी अर्टिगा:

कंपनी या वर्षी बाजारात अनेक नवीन अपग्रेडसह ही उत्कृष्ट MPV सादर करू शकते. त्याची फेसलिफ्ट आवृत्ती या वर्षी जूनमध्ये भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह ही MPV पेट्रोल आणि CNG प्रकारांमध्ये बाजारात आणणार आहे.

मारुती सुझुकीच्या हायब्रीड कार:

मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन हायब्रिड कार भारतीय बाजारपेठेत सादर करू शकते. टोयोटा मोटर्सच्या सहकार्याने कंपनीकडून या कारवर सातत्याने काम सुरू आहे. या आगामी हायब्रीड कारमध्ये तुम्हाला अनेक आधुनिक फीचर्स तसेच सुरक्षिततेसाठी उत्तम पर्याय पाहायला मिळतील.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit