file photo

Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :- एकाच गर्लफ्रेंडवर हक्क कोणी गाजवयाचे तू की मी याच्या वर्चस्ववादातून पेठ (ता. वाळवा) येथे अभिजित हरी शेलार (वय २१) याचा बुधवारी भर दुपारी पाठलाग करत सिने स्टाइलने खून केला.

मृत अभिजित याचाच जिवलग मित्र राजेंद्र मारुती बांदल (वय २५ रा.जांभूळवाडी ता.वाळवा ) याने चाकूने सपासप १२ वार करून खून केला. हल्लेखोर बांदल याने सिने स्टाइलने पाठलाग करून अभिजीतच्या पोटात चाकूने सपासप वार केले.

यानंतर त्याचा गळा चिरला. इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडी येथील अभिजीत शेलार आणि राजेंद्र बांदल हे दोघे जिवलग मित्र होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत ते सेंट्रिंगच्या कामावरही जात होते.

अभिजीत याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. दरम्यान, त्याचा मित्र राजेंद्र शेलार यानेही त्याच मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली. एकाच मुलीवर हक्क गाजवण्यासाठी दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला.   यामुळे त्या दोघांमध्ये वाद होत असत.

अभिजित आपल्या प्रेमाच्या आड येत आहे, याचा राग मनात धरून राजेंद्र बांदल याने त्याचा खून केला. याप्रकरणी अभिजितच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बांदल याला अटक केली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology