Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :-  मागील 6 महिन्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेचा संपूर्ण स्टाफ करोना प्रतिबंधक उपाययोजना, लॉकडाऊन काळातील भोजन व्यवस्था

तसेच कंटेन्मेंट झोन नियंत्रण करण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत अनेक बिल्डर आणि जमीन मालकांनी अनधिकृत बांधकाम केल्यामुळे शहरातील फोफावलेल्या अनधिकृत बांधकामात वाढ झाली आहे.

मात्र आता प्रशासनाकडून या अनधिकृत बांधकामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रभागातील अनधिकृत बांधकामाची आणि त्यावर केलेल्या कारवाईची यादी प्रसिद्ध केली जाणार असून

प्रभागात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाची जबाबदारी त्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रभागात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेत सुरुवातीलाच या बांधकामावर हातोडा मारत अनधिकृत बांधकाम होणार

नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिली असून प्रत्येक आठवड्याला या सर्व अनधिकृत बांधकामाची यादी बिल्डर आणि जागेच्या नावासह प्रसिद्ध केली जाणार आहे.

एवढ्या वरच न थांबता आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांची नावे शहरातील मुख्य भागातील दर्शनी होर्डिंग्जवर प्रसिद्ध करत या बिल्डरांची करतुद पालिका प्रशासनाकडून उघड केली जाणार आहे.

तसेच होर्डिंग्ज वर प्रसिद्ध होणाऱ्या या बिल्डरकडून नागरिकांनी घरांची खरेदी करू नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून केले जाणार आहे. एकीकडे नव्याने बांधकामे होऊ नये यासाठी ही बांधकामे सुरुवातीच्या टप्प्यात तोडण्यात येणार असून

यापूर्वी झालेली अनधिकृत बांधकामावर देखील कारवाईचा हातोडा पडणार आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology