Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर दौरा केला.

याठिकाणी त्यांने शेतकऱ्यांना दिलासा देत धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभं आहे. असं आश्वासन देत नुसता अभ्यास करणारे सरकार गेले, आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही , सर्वाना मदत दिली जाईल अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

या अस्मानी संकटात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि नुकसानग्रस्त शेतकऱयाला मुख्यमंत्र्यांनी 25 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीचे ‘ऑन द स्पॉट’ वाटप केले. राज्यात अतिवृष्टीचा धोका टळलेला नाही.

तुम्ही सुरक्षित रहा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा धीरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. हे सरकार शेतकऱ्यांच आहे’, असं म्हणतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं

जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढं उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पहाणी दौरा करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव,

खासदार विनायक राऊत, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यावरील अतिवृष्टीचे संकट टळलेले नाही. येत्या काही दिवसांत आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तसा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपले पशुधन आणि स्वतः सुरक्षित राहावे.

कोणत्याही भागात जीवितहानी होणार नाही, यासाठी तत्काळ यंत्रणा पोहोचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, स्वतःला जपा, सुरक्षित ठिकाणी रहा; सरकार तुमच्यासोबत आहे, असा धीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology