Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :- बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या एका फोटोमुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. बादशाहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचा चेहऱ्या भाजल्यासारखा दिसत आहे.

पण एखाद्याला हा फोटो पाहून त्याच्या चेहऱ्याला काहीतरी गंभीर झाले आहे का असे वाटेल. त्याच्या चेहऱ्याची त्वचा सोललेली दिसते आहे. परंतु उन्हामुळे त्याची त्वचा खराब झाली आहे. त्याची ही अवस्था मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर झाली आहे.

बादशाहच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. गायक अरमान मलिकने ‘बॅड बर्न’ म्हटले आहे तर अभिनेता मनिष पॉलने म्हटलं की, ‘भाई, टोस्टरमध्ये ब्रेडच्या ऐवजी तू स्वत: पडलास का?’ बादशाहच्या या पोस्टवर अनेक स्टार्सनी कमेंट केली आहे.

वरूण धवन देखील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. त्याची देखील अशीच अवस्था झाली होती. बादशाहच्या या पोस्टवर वरूणने देखील कमेंट केली आहे. ‘माझ्यासोबतही असंच झालं होते’, अशी कमेंट वरूणने केली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology