जर तुमची नवीन कार घेण्याची इच्छा असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या सध्या आपल्या वाहनावर विविध प्रकारचे डिस्काउंट उपलब्ध करत आहेत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या कारवर आकर्षक सूट आणि ऑफर आणल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे आणि कंपनी या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 7 कार लॉन्च करण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहे.

या कार्समध्ये कंपनीच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जुन्या कार्सच्या अपडेटेड व्हर्जनचाही समावेश आहे. कंपनी आपली कार Tata Nexon EV आणि Tata Tigor EV, Tata Harrier आणि Tata Safari पेट्रोल प्रकार, Tata Nexon ड्युअल क्लच AT, Tata Nexon CNG आणि Tata Altroz EV ची अद्ययावत आवृत्ती यावर्षी भारतीय बाजारपेठेत सादर करेल. आज आम्ही तुम्हाला या कारच्या संभाव्य वैशिष्ट्यांशी संबंधित माहिती देणार आहोत.

Tata Nexon EV (लॉग रेंज): कंपनी Tata Nexon EV चे अपडेटेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. कंपनी या कारमध्ये 40kWh चा मोठा बॅटरी पॅक देऊ शकते. नवीन बॅटरी पॅकमुळे या इलेक्ट्रिक कारची रेंज 400km पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

या कारसह, कंपनी एक मजबूत मोटर देऊ शकते जी 136PS पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. आत्तापर्यंत, कंपनीने याच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हेही वाचा:- मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीला 500 किमीची रेंज मिळेल.

2022 टाटा टिगोर ईव्ही कंपनी लवकरच 2022 Tata Tigor EV बाजारात आणू शकते. सध्या या कारची चाचणी सुरू आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देऊ शकते, तसेच या कारमध्ये कॉस्मेटिक बदलही केले जात आहेत. या कारमध्येही कंपनी एक मोठा बॅटरी पॅक देऊ शकते, ज्यामुळे त्याची रेंज 375km ते 400km पर्यंत वाढेल.

Tata Harrler आणि Tata Safari चे पेट्रोल प्रकार: कंपनी या वर्षी 2022 Tata Harrier आणि Safari चे पेट्रोल व्हेरियंट देखील लॉन्च करू शकते. ते चाचणी दरम्यान अनेकदा स्पॉट झाले आहेत. हॅरियर पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मल्टिपल ड्राइव्ह मोड्स दिसू शकतात.

कंपनी दोन्हीमध्ये 1.6L टर्बो डीआय पेट्रोल इंजिन देऊ शकते. पण या दोन्ही गाड्यांची पॉवर आणि टॉर्क निर्माण करण्याची क्षमता वेगळी असण्याची शक्यता आहे.

टाटा नेक्सॉन ड्युअल-क्लच AT: कंपनी आपली कार Tata Nexon 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनमध्य देऊ शकते. या कारमधील इंजिन 120PS कमाल पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

टाटा नेक्सॉन सीएनजी Tata Nexon ही कंपनीची एक subcompact SUV आहे जी भारतीय बाजारात उपलब्ध आहे, जी कंपनी CNG आवृत्तीमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे. टाटा नेक्सॉन सीएनजीची सध्या चाचणी सुरू आहे. त्यात फॅक्टरी फिट सीएनजी किटसह 1.2 लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते.

टाटा अल्ट्रोझ ईव्ही: कंपनी या वर्षाच्या अखेरीस Tata Altroz EV बाजारात आणू शकते. यामध्ये अपडेटेड झिपट्रॉन तंत्रज्ञान वापरता येईल. या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज मिळण्याची शक्यता आहे. Altroz EV मध्ये नियमित Altroz च्या तुलनेत काही कॉस्मेटिक बदल देखील दिसू शकतात.