MHLive24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कधीकधी आयुष्यात त्याच त्याच गोष्टी करुन माणूस थकतो आणि मग नविन पर्यायांच्या मागे लागतो. अशा वेळी नविन गोष्टीबाबत नेमकं काय धोरणं घ्याव किंवा त्या गोष्टी नेमक्या कोणत्या असाव्यात याबाबत अनेकजण संभ्रमात असतात.(Buisness Idea)

दरम्यान, आज आम्‍ही तुम्‍हाला अगदी माफक गुंतवणुकीसह अशी बिझनेस आयडिया देत आहोत, ज्यात एकदा गुंतवणूक केल्‍यावर तुम्‍ही आयुष्यभर बसून कमाई करू शकता. हा व्यवसाय ऑनलाइन होर्डिंग व्यवसायाचा आहे. हे काम तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता.

तसेच त्यासाठी जास्त जागा लागत नाही. तुम्ही हे एका खोलीतही सुरू करू शकता. कोरोनाच्या काळापासून ऑनलाइन व्यवसाय कल्पना वेगाने वाढत आहेत, त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी Gohoardings.com च्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा यांनी सांगीतले की, या व्यवसायातून त्या दर महिन्याला 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे.

शर्मा यांनी 2016 मध्ये केवळ 50,000 रुपये गुंतवून हा ऑनलाइन होर्डिंग व्यवसाय सुरू केला. पुढच्याच वर्षापासून दीप्तीने 12 कोटी रुपये कमावायला सुरुवात केली. एका वर्षात कंपनीची उलाढाल 20 कोटींहून अधिक झाली.

सुरुवात कशी करावी हे जाणून घ्या

जर तुम्हाला ग्राफिक्स, डिझायनिंग आणि कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही घरी बसून डिजिटल होर्डिंग्ज बनवण्याचे काम सुरू करू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात, तुम्ही freelancing.com किंवा upwork इत्यादीसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध साइट्सवर ऑर्डर देऊ शकता. यासाठी तुम्हाला या पोर्टल्सवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर डिजिटल होर्डिंग्ज बनवण्याबाबत माहिती देऊन लोकांकडून ऑनलाइन ऑर्डर देखील घेऊ शकता. हा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. कारण दररोज लोकांना घरबसल्या जाहिरात करायची असते.

 

दीप्तीने सांगितले की, तिची कंपनी एका महिन्याच्या कालावधीसाठी होर्डिंग्ज लावण्यासाठी सुमारे एक लाख रुपये आकारते. दुसरीकडे, दिल्ली, मुंबई सारख्या शहरांच्या हाय प्रोफाईल लोकेशन्समध्ये जास्त काळ होर्डिंग लावण्यासाठी 10 लाख रुपये मिळू शकतात.

अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे एका महिन्यात 10 होर्डिंग्जची ऑर्डर असेल तर तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकता. सणासुदीच्या काळात काही वेळा महिन्याभरात 10-12 होर्डिंग्जची ऑर्डर मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही या व्यवसायातून मोठी कमाई करू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup