Surat-Chennai Greenfield Highway : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे बाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड सहापदरी हायवे बाबत पुढील आठवड्यात एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

यामुळे सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेसाठी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणाला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यातील (Nashik) एकूण सहा तालुक्यात सदर महामार्ग दाखल होणारं असून यासाठी जिल्ह्यातील तब्बल 996 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यास आता वेग येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण तीन प्रोजेक्ट प्रस्तावित आहेत. यामध्ये सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा समावेश असून समृद्धी महामार्ग आणि पुणे सेमी हाई स्पीड रेल्वे मार्ग हे दोन प्रोजेक्ट देखील प्रस्तावित आहेत. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील 69 गावातील जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. मित्रांनो नाशिक जिल्ह्यात हा महामार्ग 122 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

नगर जिल्ह्यातील 6 तालुक्यातुन जाणार हा महामार्ग

मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे नाशिक मधून येऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये 98.5 किलोमीटर अंतर कापणार आहे. म्हणजेच नगर जिल्ह्यासाठी (Ahmednagar) देखील हा महामार्ग अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हा सहा पदरी महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती सांगितली गेली आहे.

नाशिक मधून सहा तालुक्यातुन जाणार हा महामार्ग

मित्रांनो या महामार्गामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. शिवाय सदर प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur), अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असून मराठवाड्यातील (Marathwada) बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना देखील याचा लाभ होणारं आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यातून सदर महामार्ग जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. या परिस्थितीत या सहा तालुक्यातील शेतकरी बांधवांना देखील याचा फायदा होणार असून. नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला आणि शेती क्षेत्राला याचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे विषयी थोडक्यात

या सहा पदरी महामार्गामुळे सुरत चेन्नई हे सोळाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या 1250 किलोमीटरवर येणार आहे. या महामार्गामुळे नाशिक सुरत हे अंतर 176 किलोमीटर एवढच राहणार आहे. यामुळे टेक्सटाईल हब ते वाईन सिटी हा प्रवास खूपच सोयीचा राहणार आहे. यामुळे नाशिक मधून अवघ्या दोन तासात गुजरात मधील सुरत गाठता येणार आहे. सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई आणि नासिक ही औद्योगिक दृष्ट्या तसेच शेतीच्या दृष्टिकोनातून महत्वाची शहरे परस्परांना जोडली जाणार आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याचा बद्री महामार्गासाठी सरकारने दीड वर्षात जमिनी अधिग्रहित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जमिनींचे अधिग्रहण झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजेच जवळपास दोन हजार 25 पर्यंत हा महामार्ग सामान्य जनतेसाठी खुला करण्याचे देखील टार्गेट ठरवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील 996 हेक्टर जमीन यासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. मित्रांनो सदर हायवे हा 70 मीटर रुंदीचा राहणार असून सदर महामार्गासाठी 100 मीटर रुंदीची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील 69 गावांपैकी दिंडोरीतील सर्वाधिक 23 गावांचा समावेश. सिन्नरच्या वावीत समृद्धी महामार्ग आणि हा प्रस्तावित महामार्ग परस्परांना भेदणार  आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात या सहा पदरी महामार्गाची उभारणी होणारं आहे. राज्यात राक्षसभवन (ता. सुरगाणा) येथे या महामार्गाचा गुजरात मधून प्रवेश होणारं आहे. अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे या महामार्गाचे राज्यातील शेवटचे टोक राहणार आहे.

या सहा पदरी महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक ते सोलापूर अंतर 50 किलोमीटरने कमी होणारं आहे. निश्चितच या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या (Farmer) जमिनी अधिग्रहित होणार असल्याने त्यांना याचा चांगला मोबदला मिळत देखील मिळणार आहे. अशा परिस्थितीत, या राष्ट्रीय महामार्गामुळे राज्यातील विकासाला गती मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे देशातील प्रमुख औद्योगिक शहरांसाठी प्रवास सुलभ होणार असल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.