Sukanya Samruddhi Yojna :आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजने झालेल्या बदलाबाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक जर तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘सुकन्या समृद्धी योजना’ (SSY) योजनेत गुंतवणूक करू शकता.

या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य वाचवू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी लाखो रुपयांचे मालक व्हाल.

आता जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवणार असाल, तर जाणून घ्या यातील बदल. यापूर्वी या योजनेत दोन मुलींच्या खात्यावर 80 सी अंतर्गत सूट उपलब्ध होती. तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग झाला नाही. पण आता जर एखाद्या मुलीला दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघांचेही खाते उघडण्याची तरतूद आहे.

या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची तरतूद आहे. तुम्ही किमान रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते डीफॉल्ट होईल. पण आता असे होणार नाही. आता, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मुदतपूर्तीपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल.

पूर्वीच्या नियमानुसार 10 वर्षांची मुलगी हे खाते चालवू शकत होती. पण आता नवीन नियमानुसार मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवता येणार नाही. तोपर्यंत फक्त पालकालाच खाते चालवावे लागेल. नवीन नियमांनुसार खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.

याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. मुलीचे मुदतपूर्तीपूर्वी निधन झाल्यास किंवा तिचा पत्ता बदलल्यास या योजनेचे खाते बंद केले जाऊ शकते. पण आता मुलीला जीवघेणा आजार झाला तरी खाते बंद करता येणार आहे. पालकांचे निधन झाले तरी खाते आधी बंद केले जाऊ शकते.