Success Story : माणसाने यशस्वी (Success) होण्यासाठी नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात जर संपूर्ण समर्पण भाव ठेऊन केवळ कष्ट, कष्ट आणि कष्टचं केले तर निश्चितचं त्या क्षेत्रात यशाला सहजच गवसनी घालता येते.

बिहारमधील (Bihar) एका अवलियाने देखील ही गोष्ट सत्यात उतरवली असून आज त्याने यशाची गिरीशिखरे सर केली आहेत. बिहार राज्यातील भागलपूरचे रहिवासी असलेले 34 वर्षीय मनोज कुमार यांनी कष्ट केले म्हणजे यशाला देखील नतमस्तक व्हावे लागते हे दाखवून दिले आहे.

मित्रांनो मनोज एकेकाळी गल्लो-गल्ली जाऊन घरोघरी कपडे विकायचे, पण आज मनोज आपल्या कष्टाच्या आणि सामर्थ्यांच्या जोरावर यशाची उंच शिडी चढले आहेत आणि शेकडो लोकांना रोजगार देखील देत ​​आहेत (Business Success Story).

एकेकाळी गल्लो-गल्ली हिंडून कपडे विकणाऱ्या मनोजच्या मिलमध्ये, फॅक्टरीमध्ये आज खादी, ताग, कापूस, चादर, धोतर आदी वस्तू तयार केल्या जात आहेत. आजच्या घडीला मनोज यांचा माल हा केवळ भागलपूर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून बिहार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याचा पुरवठा केला जात आहे, हे नक्कीच विशेष आहे.

एवढंचं नाही आजच्या घडीला मनोज यांचा माल परराज्यात देखील पाठवला जात आहे. कानपूर, बनारस, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये आता मनोज (Successful Businessmen) यांचा माल विक्रीसाठी दाखल होतं आहे.

मनोज कुमार यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर आजपासून 10 वर्षांपूर्वी ते महाजन म्हणजे कापडं व्यापाऱ्यांकडून (Cloth merchants) कपडे घेऊन ग्रामीण भागात गल्लो-गल्लीत, घरोघरी जाऊन कपडे विकायचे. त्यानंतर त्यांनी हळूहळू हा आपला छोटासा व्यवसाय (Small Business) मोठा करण्यास सुरवात केली. हळूहळू व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली आणि काही वर्षानंतर मनोज यांनी महाजन यांच्याकडून कपडे घेऊन जिल्ह्यातील इतर भागात देखील कपडे विकण्यास सुरवात केली. यानंतर या व्यवसायातील बारकावे लक्षात आल्यानंतर सावकारांकडून कापड घेऊन इतर राज्यातील व्यापाऱ्यांना कापड पुरवठा करण्याचं काम मनोज यांनी सुरु केले. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि चांगल्या स्वभावामुळे ग्राहक त्याच्यावर खूप विश्वास ठेवू लागले आणि हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला.

10 वर्षे महाजनकडून कापडं घेऊन विक्री केली

मनोज महाजन यांच्याकडून कपडे घेऊन घरोघरी विकायचे असं त्यांनी तब्बल 10 वर्षे केलं. मनोज यांच हे काम अतिशय व्यवस्थित सुरू होते. त्यांना यातून चांगली कमाई देखील होतं होती. दरम्यान, व्यापाऱ्यांनीच त्याला कापड तयार करण्याचा सल्ला दिला आणि व्यवसाय करण्यासाठी भांडवलही दिले. येथूनच मनोजकुमार यांचा उद्योजक होण्याचा प्रवास सुरु झाला आणि त्यांच्या नशिबाचा सितारा देखील येथूनचं खऱ्या अर्थाने चमकला. कापडं बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी भागलपूरमध्ये पॉवरलूम उभारून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात केली. मनोज कुमार यांची दरियापूर येथे जमीन होती, त्यांनी तेथे आपली लूम स्थापन केली. आता मनोज कुमार यांचे 36 पॉवरलूम सुरू झाले आहेत. आता ते जवळपास 100 जणांना आपल्याकडे रोजगार देत आहेत.

कॉटन साडी बनवण्याचा आहे बेत 

मनोज कुमार हा भागलपूरच्या नाथनगरमधील गोल्डरपट्टीचा रहिवासी आहे. तो कॉटन, लिनन, चादर, खादीचे धोतर तयार करून राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यातही पुरवत आहे. आता मनोज त्यांच्या मिलमध्ये कॉटन साडी बनवण्याचा विचार करत आहे. साडी तयार करण्यासोबतच ब्लाउजही तयार होणार आहे. याशिवाय कुर्ती बनवण्याचाही विचार करत आहे. मनोज कुमार यांनी सांगितले की, आम्ही आता सुरत आणि महाराष्ट्रातून कुर्ती मागवत आहोत, पण लवकरच साडी, ब्लाउज इत्यादी त्यांच्याकडे तयार केले जाणार आहेत.

मनोज कुमार आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी 25शे यंत्रमाग सुरू करण्याचा विचार करत आहेत. मनोज कुमार म्हणाले की, व्यवसाय वाढवून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. यंत्रमाग उभारल्यानंतर किमान पाच हजार लोकांना तातडीने रोजगार मिळेल, कारण यंत्रमाग सुरू होताच पाच हजार लोकांची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ते आपल्या राज्यातील तसेच इतर राज्यांतील कुशल कारागिरांना काम देऊन चांगले काम करतील जेणेकरुन आपल्या राज्याला वैभव प्राप्त करून देताना स्थानिक लोकांनाही कौशल्ये शिकवता येतील.