MHLive24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सकाळचे फिरणे म्हणजेच मॉर्निग वॉक सर्वांत चांगला व्यायाम आहे. घरी असो वा ऑफिसात एक तासापेक्षा जास्त वेळ एका जागी बसून राहू नये.( Stay fit without going to the gym)

आजच्या दगदगीच्या जीवनात सर्वांनाच जिमला जाण्यासाठी वेळ नसतो आणि ख्रिसाही त्याला परवानगी देत नसतो. यासाठी घरचे व ऑफिसचे काम करीत कशाप्रकारे स्वत:ला फिट व आरोग्यवान ठेवता येऊ शकते ते पाहूया.

या दोन गोष्टी महत्त्वाच्या

१. पहिले काम, आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी सुधारण्याचे करा. सामान्यत: व्यक्ती खाण्या -पिण्यात बेपर्वाई करते व त्यानंतर बे ढा शरीर दुरुस्त करण्यासाठी जिमकडे वळते. नेहमी साधे व पौष्टिक खा. याशिवाय ही गोष्ट लक्षात ठेवा की, नेहमी आपल्या भुकेपेक्षा थोडे कमी खा. बहुतेकांना डाएटपेक्षा जास्त खाल्ल्यानंतर पाणीही पिण्याची सवय असते.

२. शक्‍य तेवढे पायी चालण्याचा प्रयत्न करा. यासाठी आजच्या बिझी लाइफमधून वेगळा वेळ काढणे अशक्य असते. जर यासाठी घर, ऑफिस वा इतर जागेचा वापर केला तर वेगळा वेळ काढण्याची गरज पडणार नाही. अर्थातच काही सामान आणायला जाताना वाहन वापरण्याऐवजी पायी जाऊन आणू शकता.

असा असावा डाएट प्लॅन

दिवसभरात १0 ते १२ ग्लास लिक्विड डाएट घ्या. यामध्ये पाणी मठ्ठा, सूप, ग्रीन टी, तसेच हेल्दी ड्रिक्सचा समावेश करू शकता. वडिलधाऱ्यांनी सांगितले आहे की, नाश्ता एखाद्या राजपुत्राप्रमाणे, खावा. अर्थांतच जे जास्त आवडते ते खावे पण डाएटनुसारच.

दुपारचे जेवण राजासारखे म्हणजेच त्यात प्रोटीनचे प्रमाण पुरेसे असावे.(भाजी, भाकरी वा चपाती, डाळ-भात सॅलड घ्यावे.) रात्रीचे जेवण लवकर करावे. त्यात हेवी डाएट नसावेत. उदा. सॅलड, सूप, साधी भाजी-भाकरी वा खिचडी, पुलाव इ.

व्यायमही हवा

सकाळचे फिरणे म्हणजेच मॉर्निंग वॉक सर्वांत चांगला व्यायाम आहे. घरी असो वा ऑफिसात एक तासापेक्षा जास्त वेळ एका जागी बसून राहू नये. वरचेवर सीटवरून उठून इकडेतिकडे थोडेसे फिरावे. यामुळे स्वतःला फ्रेश वाटेल. पण खाल्ल्या-पिल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग अवश्य करावे.

या सवयी लावून घ्या

१. सकाळी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून प्या.

२. ऑफिस वा घरी लिफ्टने जाण्याऐवजी जिन्याचा वापर करावा.

३. मादक पदार्थ व धुग्रपानापासून दूर राहा.

४. घरगुती जेवण असो वा रेडीमेड, भाजी जास्त व मसाले कमी असावेत.

५. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.

६. किमान सहा तासांची भरपूर झोप घ्यावी.

७. जेवण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी खाणे कधीही चांगले.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology