Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :- बिहारमध्ये NDA सरकार आलं तर बिहारच्या सर्व जनतेला कोव्हिडची लस मोफत देण्यात येईल’ अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली आहे. भाजपच्या वचननाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण थोडे तापले आहे.

तसेच विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी देखील भाजपाला एक सवाल केला आहे. ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी,

मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे असे म्हटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का?’, असे प्रश्नही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले आहेत.

थोरात म्हणाले की, सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?,

असे प्रश्न थोरात यांनी विचारले आहेत. ‘कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे.

प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मोफत लस देणार हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आह’, अशी टीका करत थोरातांनी भाजपाच्या मोफत लसीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology