Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून सोडले. जगाची फिरती चाके थांबवली.आर्थिक उलाढाल मंदावल्या. जणू काही जग निपचित पडल्यासारखे होते.

याचा परिणाम जनसामान्यांवर खूप झाला. दैनंदिन जीवनाबरोबरच आरोग्यावरही याचा चांगलाच परिणाम झाला. अनेकांना मानसिक ताणापायी विचित्र स्वप्न पडू लागल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

कोरोनाचा उद्रेक त्यानंतरचा लॉकडाऊन आणि या दरम्यान लोकांच्या स्वप्नांबाबत माहिती मिळविण्यासाठी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डीअरड्रे बॅरेट यांनी ऑनलाइन सर्वेक्षण केलं.

मेपर्यंत 25000 व्यक्ती सर्वेक्षणात सहभागी झाल्या आहे. त्यापैकी सहा हजार बॅरेट यांनी विश्लेषण केलं. ही स्वप्नं लॉकडाऊन, कोरोनाचा उद्रेक यांच्याशी संबंधित असल्याचं बॅरेट यांनी हॉवर्ड गॅझेटला सांगितलं.

बॅरेट यांच्या म्हणण्यानुसार स्वप्नातील रुपकांमध्येही कोरोना विषाणूची पार्श्वभूमी अनेकांना दिसत आहे. जगभर कोरोनाचा भीषण कहर पसरला आहे आणि जीवाची भीती निर्माण झाली आहे, आपल्याला तुरुंगात टाकलं आहे,

किड्यांच्या समूहांनी आपल्यावर हल्ला केला आहे, अशी भीतीदायक स्वप्न पडल्यांचं लोकांनी सांगितलं आहे.

 नेमके काय होतेय ? ; तज्ज्ञ म्हणतात… :- तज्ज्ञांच्या मते जी काही वाईट स्वप्नं येतात त्याला मुख्य कारण तणाव आहे. आपण जेव्हा झोपतो आणि स्वप्न बघतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. 2020 मध्ये तणावाचा स्तर हा सामान्य राहिलेला नाही.

सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशमुळे ताण प्रचंड वाढला आहे, असं हेल्थ रिसर्चर रूचिता चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. तणावात झोप न येणं, रात्री अचानक जाग येणं, कोरोनाचा अधिकाधिक फैलाव होतो अशी स्वप्न पडणं त्यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनत असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.

महासाथीमुळे जो मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे तो कुठपर्यंत राहिल हे सांगणं कठीण असल्याचं त्या म्हणतात. मात्र दीर्घकाळ तणाव हा धोकादायकच असू शकतो नैराश्य, सामाजिक चिंता, चिंतेत वाढ होण्याचा धोका यातून असून त्याचा प्रभाव आपल्या स्वप्नांवर पडू शकतो, असं त्या म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सत्य प्रकाश म्हणाले, “सामाजिक पुनर्वसन आणि अधिक स्वप्नं पाहणं यामधील संबंध दर्शवणारे सैद्धांतिक पुरावे उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे कोरोनाच्या काळात सामान्य मानसिक आरोग्य बिघडलं आहे. आपण जगू आणि जग टिकेल याची खात्रीच उरलेली नाही.

मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू, नोकऱ्या जाणं या विचारांमुळे चिंतेची पातळी प्रचंड वाढली असून यामुळे नकारात्मक विचारांची स्वप्नंही वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology