Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. पेंट व्यवसायातील दिग्गज एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्सच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्री झाली आहे.

बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, एशियन-बर्गर पेंट्सच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली. या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे ग्रासिम इंडस्ट्रीजने पेंट व्यवसायाबाबत केलेली घोषणा.

काय आहे घोषणा: आदित्य बिर्ला समूहाची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजने सांगितले की पेंट व्यवसाय सुरू करण्यासाठी निर्धारित भांडवली खर्चाच्या दुप्पट वाढ करून 10,000 कोटी रुपये केले आहेत.

कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीपासून पेंट उत्पादन सुरू करण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. ग्रासिम इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पेंट व्यवसाय सुरू करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

मात्र सजावटीच्या रंगकाम उद्योगाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेंट्स बनवण्यासाठी पाच-सहा प्लांट्स उभारण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले.

पानिपत आणि लुधियाना येथील प्रस्तावित प्लांटचे बांधकामही सुरू झाले आहे. कर्नाटकातील चामराजनगरमध्येही लवकरच बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित तीन प्लँटसाठी शासनाकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा आहे.