सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. चला तर आज आपण चर्चेत राहिलेल्या काही शेअर बाबत जाणून घेऊया.

वास्तविक अदानी पॉवर, अदानी विल्मर, श्री रेणुका शुगर या कंपन्यांच्या शेअर्सनी गेल्या 3 दिवसांत त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

या तिन्ही शेअर्सनी 3 दिवसात 14 ते 15.74 टक्के नफा कमावला आहे. हे तिन्ही स्टॉक यावर्षी आतापर्यंत मल्टीबॅगर ठरले आहेत.

अदानी पॉवर शेअर किंमत इतिहास सोमवारी शेअर बाजारातील घसरणीनंतरही, अदानी पॉवर 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह 272.05 रुपयांवर बंद झाला, तर अदानी विल्मर देखील त्याच अपर सर्किटसह 764.95 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. तर रेणुका शुगरचा भाव 2.69 टक्क्यांनी घसरून 59.70 रुपयांवर बंद झाला.

अदानी विल्मर शेअर किंमत इतिहास जर आपण रिटर्नबद्दल बोललो, तर अवघ्या 78 दिवसांत अदानी विल्मार 227 रुपयांवरून 764.95 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यात 82 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

अदानी पॉवरबद्दल बोलायचे झाले तर ते आपल्या गुंतवणूकदारांना सतत श्रीमंत बनवत आहे. एका महिन्यात त्यात जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एका वर्षात 210 टक्के परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 272.05 आणि नीचांकी रु. 70.35 आहे. हे आकडे NSE चे आहेत.

श्री रेणुका शुगर शेअर किंमत इतिहास रेणुका शुगर सोमवारी घसरणीने बंद झाली असली तरी हा साखरेचा स्टॉक सातत्याने गुंतवणूकदारांच्या मनात गोडवा भरत आहे. त्यात गेल्या एका महिन्यात सुमारे 70 टक्के आणि वर्षभरात 503 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात ते 9.85 रुपयांवरून कमाल 63.20 रुपयांपर्यंत वाढले आहे