Share Market
Share Market

MHLive24 टीम, 04 एप्रिल 2022 :- Share Market : काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान युद्धाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज आम्ही अशाच चार स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत. एक टाटा ग्रुपची कंपनी आणि दुसरी अदानी ग्रुपची कंपनी. याशिवाय दोन कंपन्या गुजरातमध्ये आहेत.

अदानी पॉवर पॉवर: 64.40 टक्के मजबूत परतावा

अदानी पॉवरने गेल्या एका महिन्यात 64.40 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. महिनाभरापूर्वी अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला. एका महिन्यात अदानी पॉवरचा भाव 115.35 रुपयांवरून 203.60 रुपयांवर पोहोचला.

GNFC चे शेअर्स

गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारा आणखी एक स्टॉक म्हणजे GNFC. गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्सचे शेअर्स एका महिन्यात 56 टक्क्यांनी वाढले. एका महिन्यात ते 537.05 रुपयांवरून 875.35 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी तो 862.75 रुपयांवर बंद झाला होता.

छपरफाड परतावा देणारी TTML

टाटा समूहाची कंपनी टीटीएमएलचेही नाव घसघशीत परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आहे. गेल्या एका महिन्यात शेअर 48.81 टक्क्यांनी वधारला आहे. एका महिन्यात हा शेअर रु. 90.50 वरून 175 रुपयांवर पोहोचला आहे.

गुजरात अल्कली

गुजरात अल्कली ही आणखी एक कंपनी देखील एका महिन्याच्या कालावधीत मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच 48.74 टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यापूर्वी NSE वर तो 613.60 रुपयांचा नीचांक होता. या कालावधीत तो 962.00 रुपयांचा उच्चांक देखील पाहिला आहे. शुक्रवारी तो 946.50 रुपयांवर बंद झाला.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit