Share Market सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच एक महाकाय फार्मा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत लाभांश देणार आहे. ही कंपनी अॅबॉट इंडिया आहे.

फार्मा कंपनी Abbott India ने जाहीर केले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 145 रुपये अंतिम लाभांश आणि 130 रुपये विशेष लाभांश मंजूर केला आहे.

हा अंतिम लाभांश 17 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल. मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत Abbott India चा निव्वळ नफा 39% ने वाढून रु. 211 कोटी झाला, 39%. गेल्या वर्षी याच काळात अॅबॉट इंडियाला 152 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वाढून रु. 1,255 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत रु. 1,096 कोटी होता.

31 मार्च 2022 रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने 799 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला 691 कोटी रुपयांचा नफा झाला होता

. कंपनीच्या शेअर्सनी 7,000% पेक्षा जास्त परतावा दिला; 18 जानेवारी 2002 रोजी अॅबॉट इंडियाचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 239.55 रुपयांच्या पातळीवर होते.

18 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 17,820 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 7,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 18 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर हे पैसे सध्या 74.38 लाख रुपये झाले असते.

अॅबॉट इंडियाच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत 322 टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23,934.45 रुपये आहे. Abbott India च्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 15,514 आहे.