MHLive24 टीम, 22 जानेवारी 2022 :- भारतात 2020 पासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे प्रमाण भरपूर वाढले. अनेक नवीन गुंतवणुकदार या काळात शेअर मार्केटमध्ये सामील झाले. दरम्यान गुंतवणुकदारांना अधिकृत घडामोडींचे ज्ञान अवगत करण्यासाठी सेबीने आपले स्वतःचे ॲप लाँच केले आहे.(SEBI Saarthi App)

ॲप लाँच करताना सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले की, हे मोबाईल ऍप गुंतवणूकदारांना सिक्युरिटी मार्केटचे ज्ञान देण्यासाठी SEBI चा एक नवीन उपक्रम आहे.

त्यांनी सांगितले की अलीकडे बाजारात वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. बहुतेक गुंतवणुकदार मोबाईल फोनवर ट्रेड करतात. SEBI चे हे Saa₹thi मोबाईल अॅप या गुंतवणूकदारांना बाजाराशी संबंधित माहिती मिळवणे सोपे करेल.

ते म्हणाले की, येत्या काळात हे अॅप गुंतवणूकदारांमध्ये विशेषत: तरुण गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होईल.

उद्देश काय आहे

सेबीने सांगितले की, Saa₹thi मोबाइल अॅपचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांमध्ये सिक्युरिटी मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, बाजारातील घडामोडी, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण इत्यादींबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.

हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध

Saa₹thi मोबाईल अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे Android आणि iOS वापरकर्ते प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात. त्यागी म्हणाले की, नंतर हे अॅप इतर प्रादेशिक भाषांमध्येही आणले जाईल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup