Royal Enfield Classic 350
Royal Enfield Classic 350

MHLive24 टीम, 03 एप्रिल 2022 :- Royal Enfield bullet : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे. भारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. त्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350, भारतीय बाजारपेठेतील प्रीमियम सेगमेंटमधील सर्वोत्तम आणि लोकप्रिय बाइक, तिच्या मजबूत इंजिन आणि आकर्षक लूकसाठी चांगलीच पसंत केली जाते. या प्रिमियम बाईकमुळे तुम्ही बराच वेळ आरामात गाडी चालवू शकता, तसेच त्यामधून ऑफ-रोडिंगही करता येते.

भारतीय बाजारपेठेत या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹1.87 लाख ते ₹2.18 लाखांपर्यंत आहे. दरम्यान अनेक ऑनलाइन सेकंड हँड बाइक खरेदी आणि विक्री वेबसाइट्सद्वारे, तुम्ही ही बाईक फक्त ₹ 60,000 च्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

या साइट्सवर तुम्हाला अनेक प्रकारचे उत्तम सौदे आणि ऑफर्स देखील पाहायला मिळतात. जाणून घेऊया संपूर्ण अहवाल

CARANDBIKE वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही CARANDBIKE वेबसाइटवर Royal Enfield Classic 350 चे 2015 मॉडेल खरेदी करू शकता. या बाईकची किंमत 50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने यावर कोणतीही ऑफर उपलब्ध करून दिलेली नाही.

ड्रूम वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही DROOM वेबसाइटवर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे 2016 मॉडेल खरेदी करू शकता. या बाईकची किंमत ₹ 59,000 निश्चित करण्यात आली आहे. या बाईकवर कंपनीकडून फायनान्स सुविधाही दिली जात आहे.

OLX वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही OLX वेबसाइटवर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे 2013 चे मॉडेल खरेदी करू शकता. या बाईकची किंमत ₹ 65,000 निश्चित करण्यात आली आहे. कंपनीकडून या बाइकवर कोणत्याही प्रकारची ऑफर नाही.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup