Rakesh JhunJhunwala Portfolio  : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच गेमिंग कंपनी नाझारा टेक्नॉलॉजीजच्या बोर्डाने बोनस शेअर जारी करण्याची शिफारस केली आहे.

कंपनीने शुक्रवारी नियामक फाइलिंगमध्ये हे सांगितले आहे. Nazara Technologies 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर करेल. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे एक शेअर असेल त्यांना एक बोनस शेअर मिळेल.

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत मोठा हिस्सा आहे. नझारा टेक्नॉलॉजीचा शेअर शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 14.19 टक्क्यांनी वाढून 1,253.95 रुपयांवर बंद झाला.

मिळेल. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत मोठा हिस्सा आहे.

नझारा टेक्नॉलॉजीचा शेअर शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 14.19 टक्क्यांनी वाढून 1,253.95 रुपयांवर बंद झाला. बिग बुलकडे कंपनीमध्ये 10% पेक्षा जास्त हिस्सा आहे.

अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे नझारा टेक्नॉलॉजीमध्ये 32,94,310 शेअर्स किंवा 10.10 टक्के हिस्सा आहे. हे आकडे मार्च तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नचे आहेत.

बिग बुलने नझारा टेक्नॉलॉजीजमधील आपला हिस्सा कमी केला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीतील त्यांची भागीदारी 10.8 टक्के होती. नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स गेल्या एका महिन्यात जवळपास 23 टक्क्यांनी घसरले आहेत.

या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 50% घसरण झाली आहे ,

या वर्षी आतापर्यंत Nazara Technologies चे शेअर 48.33 टक्क्यांनी घसरले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,408.40 रुपयांच्या पातळीवर होते.

13 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 1,244.35 रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 46 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स जवळपास 25 टक्क्यांनी घसरले आहेत.