बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेन्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी मार्च 2022 व्या तिमाहीत टाटा ग्रुपच्या कंपनीत 14.50 लाख नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे हे विशेष.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2022 च्या तिमाहीत IHCL मध्ये 2.12% हिस्सा घेतला होता.

आयएचसीएलचे शेअर्स त्याच्या गुंतवणूकदारांसाठी बहुगुणी ठरले आहेत. या कंपनीने गेल्या एका वर्षात 162% परतावा दिला आहे.

राकेश झुनझुनवाला यांची इंडियन हॉटेल्स कंपनीत किती भागीदारी आहे? BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे मार्च 2022 पर्यंत IHCL मध्ये 1.99% स्टेकह 151, 22200 इक्विटी शेअर्स होते.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2029 पर्यंत इंडिया हॉटेल्समध्ये 1.08% म्हणजेच 14279200 इक्विटी शेअर्स होते. अशाप्रकारे, जानेवारी ते मार्च या तिमाहीत राकेश झुनझुनवाला याच्याकडे 14.50 लाख शेअर्स होते.

मल्टीबॅगर परतावा टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीने गेल्या वर्षभरात अनेक रिटर्न दिले आहेत. गेल्या एका वर्षात या समभागाने 162% परतावा दिला आहे. यासोबतच इंडियन इंटिल्स कंपनीने यावर्षी आतापर्यंत 30% परतावा दिला आहे. शुक्रवार, 22 एप्रिल रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर 1.11% घसरून 241.50 रुपयांवर बंद झाले.