बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच स्टॉक मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार, बाजाराच्या मूड आणि वातावरणानुसार शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यात तज्ञ मानले जातात.

असे मानले जाते की त्यांच्याकडे अशा कंपन्यांची चांगली ओळख आहे, ज्यांचे शेअर्स भविष्यात उच्च परतावा देऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात.

मग ते छोटे गुंतवणूकदार असोत वा म्युच्युअल फंड किंवा परदेशी गुंतवणूकदार (FII). मार्च तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, म्युच्युअल फंड किंवा परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील अनेक शेअर्समध्ये अतिरिक्त खरेदी केली आहे.

तथापि, त्यांनी स्वतःला काही स्टॉकपासून दूर ठेवले आहे. आम्ही येथे फक्त राकेश झुनझुनवलांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले स्टॉक दिले आहेत, ज्यांचे होल्डिंग व्हॅल्यू 500 कोटी किंवा त्याहून अधिक आहे.

कॅनरा बँक कॅनरा बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, मार्च तिमाहीत, म्युच्युअल फंड (MF) ने त्यात आपला हिस्सा 3.44 टक्क्यांवरून 3.22 टक्क्यांवर आणला आहे. तर परकीय गुंतवणूकदारांनी (FII) हिस्सा 7.62 टक्क्यांवरून 8.48 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा बँकेत 2 टक्के हिस्सा आहे.

फोर्टिस हेल्थकेअर म्युच्युअल फंड (MF) ने मार्च तिमाहीत फोर्टिस हेल्थकेअरमधील आपला हिस्सा 14.31 टक्क्यांवरून 15.53 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तर विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) हिस्सा 30.08 टक्क्यांवरून 29.82 टक्क्यांवर आणला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा बँकेत 4.2 टक्के हिस्सा आहे.

एनसीसी लि. म्युच्युअल फंडांनी (MFs) देखील NCC मधील त्यांचे स्टेक वाढवले ​​आहेत. आता त्यांची कंपनीत 12.12 टक्क्यांऐवजी 12.23 टक्के हिस्सेदारी आहे. तर विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) हिस्सा 11.62 टक्क्यांवरून 8.89 टक्क्यांवर आणला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत 12.8 टक्के हिस्सा आहे.

टाटा मोटर्स म्युच्युअल फंड आणि FII या दोघांनीही टाटा मोटर्समधील त्यांचे स्टेक कमी केले आहेत. आता कंपनीतील म्युच्युअल फंडाचे शेअरहोल्डिंग 6.52 टक्क्यांवरून 6.47 टक्क्यांवर आले आहे. तर FII चा हिस्सा 14.57 टक्क्यांऐवजी 14.45 टक्क्यांवर आला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत 1.2 टक्के हिस्सा आहे.

टायटन कंपनी म्युच्युअल फंडाने राकेश झुनझुनवाला यांच्या सर्वात विश्वासार्ह स्टॉक टायटन कंपनीमधील स्टेक 4.45 टक्क्यांवरून 4.56 टक्के केला आहे. तर कंपनीतील FII ची हिस्सेदारी 18.55 टक्क्यांवरून 18.40 टक्क्यांवर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत 5.1 टक्के हिस्सा आहे.

क्रिसिल लि. मार्च तिमाहीत क्रिसिल लि. म्युच्युअल फंडाने आपला हिस्सा 2.55 टक्क्यांवरून 3.22 टक्के केला आहे. तर कंपनीतील FII ची हिस्सेदारी 6.84 टक्क्यांवरून 6.65 टक्क्यांवर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत 5.5 टक्के हिस्सा आहे.

ज्युबिलंट फार्मोवा जुबिलंट फार्मोवामधील म्युच्युअल फंडाचा हिस्सा मार्च तिमाहीत ०.३९ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांवर आला आहे. कंपनीत FII ची हिस्सेदारी 23.18 टक्क्यांवरून 23.45 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. राकेश झुनझुनवाला यांची कंपनीत 6.8 टक्के हिस्सेदारी आहे.