Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला धक्का बसला आहे.

आता काँग्रेसमध्ये येण्यासाठी भाजपचे अनेक जण इच्छुक आहेत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात आम्ही सर्व मिळून भाजपचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

भाजपमधील लोकांचा पक्षात येण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बिहार निवडणुकीत भाजप व नितीशकुमार यांच्याबाबत जनतेमध्ये नाराजी आहे.

तर लालू प्रसाद यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे. त्यामुळे भाजप मतांच्या राजकारणासाठी आपल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याची केलेली घोषणा निषेधार्ह आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहारला मोफत लस देत असाल तर इतर राज्यातील लोकांनाही ती द्यावी लागेल,

अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology