Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची पाहणी सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळावरी पाहणी दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबादेत पाहणी दौरा करत असून येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. मागच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच मागणी होती. ते नेमके काय बोलले होते, याचे व्हिडीओच दाखवत फडणवीस यांनी आता आपण सत्तेत आहात, त्यामुळे बोललेले करुन दाखविण्याची संधी आहे. ती दवडू नका, अशी कोपरखळी मारली.

नुकसान पाहणी दौºयावर आलेल्या फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टीने पिके तर गेलीच, शेतीही खरवडून गेली आहे. दीर्घकालीन नुकसानीच्या भरपाईसाठी विशेष योजना जाहीर केली पाहिजे़ ही वेळ राजकारणाची नाही,

संवेदनशीलता दाखविण्याची आहे. केंद्र सरकार निश्चितच चांगली मदत करेल, पण राज्य सरकारनेही मदत तातडीने जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही फडणवीस म्हणाले. जलयुक्तची चौकशी लावून आमचे तोंड सरकार दाबू शकत नाही.

६ लाख कामे झाली़ त्यात केवळ ७०० तक्रारी आल्या. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यांनी जरुर चौकशी करावी, असेही फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology