ऑटो सेक्टर मध्ये भारत हा टॉपचा देश आहे. भारतात दरवर्षी कित्येक वाहनांची खरेदी विक्री केली जाते. याचबरोबर भारतात अनेक कंपन्यांची वाहने देखील लाँच केली जातात.

अशातच जर तुम्हाला, जर नवीन मोटारसायकल घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी आम्ही आज भारतीय बाजारात नव्याने लाँच होणाऱ्या बाइकबद्दल सांगणार आहोत.

वास्तविक Honda Motorcycle & Scooter भारतात तिचे अनेक इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

मानेसर प्लांटला निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याची कंपनीची योजना आहे. एंट्री-लेव्हल 100 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये नवीन बाइक लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.

कंपनी भारतात 23 मोटारसायकली विकते होंडा टू-व्हीलर सध्या भारतात एकूण 23 मोटारसायकली विकते. या यादीमध्ये 3 क्रूझर बाइक्स, 6 कम्युटर बाइक्स, 7 स्पोर्ट्स बाइक्स, 4 स्कूटर, 3 ऑफ रोड बाइक्सचा समावेश आहे.

कंपनीच्या लोकप्रिय मोटरसायकल Honda CB Shine, Honda Activa 6G, Honda Dio, Honda SP 125, Honda CB Unicorn 160, Honda CD 110 Dream, Honda X-Blade, Honda Hornet 2.0, Honda Livo, CB350, Honda X-Blade या कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय बाइक्स आहेत.

Honda जसे की CB200X, Honda Activa 125 FI, Honda Grazia, Honda Gold Wing, Honda CBR1000RR, Honda H-ness CB350, Honda CB300R, Honda Africa Twin, Honda CBR650R, Honda CBNF, Honda CBN510R, Honda CBN50R Plus, Honda CBR650R मॉडेल समाविष्ट आहे.

कंपनी स्वस्त मोटरसायकल लाँच करणार आहे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाटा यांनी सांगितले की, होंडा भारतात आणखी विस्तार करेल. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत नवीन मॉडेल्सचा व्यवसाय पुढे नेल्याने, कंपनीने स्वस्त मोटारसायकलीही बाजारात आणण्याची योजना आखली आहे. सध्या HMSI 40 देशांमध्ये आपल्या दुचाकींची निर्यात करते.

HMSI चे संचालक (विक्री आणि विपणन) यादवंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले की, पुरवठा साखळीतील समस्या अजूनही कायम आहेत. उद्योगांनाही वस्तू आणि इंधनाच्या किमतीत वाढ होत आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्हाला सुधारणा अपेक्षित आहे.