Mhlive24 टीम, 19 ऑक्टोबर 2020 :- शिवाजीनगर न्यायालय परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या वकिलाचा खून झाल्याचे समोर आले. उमेश मोरे असे मृत वकिलाचे नाव असून याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उमेश मोरे यांचे 1 ऑक्टोंबर रोजी अपहरण करण्यात आले होते.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्याजवळ एका घाटात मोरे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

याप्रकरणी कपिल फलके, दीपक वांडेकर, रोहित शेंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी एसीबी ने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या

करवाई मध्ये उमेश मोरे फिर्यादी होते. या खुनाचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology