Mumbai Nagpur Expressway : शिवसेना सुप्रीमो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गा बाबत (samruddhi mahamarg) एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई (mumbai) आणि नागपूर (nagpur) या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपये खर्च आहे. आता या खर्चासाठी उभारण्यात आलेल्या निधीची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी (expressway) रस्ते महामंडळाने तब्बल 28 हजार कोटींचे कर्ज काढले असल्याचं स्पष्ट झालं आहे.

देशातील तेरा राष्ट्रीयीकृत बॅंकांतन कर्जाची उभारणी करण्यात आली आहे. रस्ते महामंडळाने बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी घेतलेले हे कर्ज टोलच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल केले जाणार आहे. अशा परिस्थितीत या कर्जावर काही जाणकार लोकांकडून आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

मित्रांनो रस्ते महामंडळाने 13 राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर तब्बल साडेदहा टक्के एवढा व्याजदर आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे जपानी बँक जायका इंटरनॅशनल आणि एशियन डेव्हलपमेंट अवघ्या एक ते साडेतीन टक्के दराने कर्ज देते. यामुळे साडे दहा टक्के

सदर व्याजदराने कर्ज घेण्याचे नेमकं कारण काय? असा प्रश्न जाणकार लोकांनी उपस्थित केला आहे. शिवाय, या कर्जाची परतफेड करण्याची मुदत 25 वर्षे एवढी ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नागरिकांच्या देखील आता भुवया उंचावल्या आहेत. मित्रांनो समृद्धी महामार्गाच्या वित्तीय आराखड्यात बदल करण्यात आला असून शुक्रवारी या बदलास महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. सदर वित्तीय आराखड्यात बदल करण्यात आलेल्या सर्व बाबींचा तपशील आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महामार्गाला महाराष्ट्र शासनाची अर्थसाहाय्य सूट :- समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र शासनाने रॉयल्टीमध्ये सूट देखील दिली आहे. सदर चर्चेत असलेल्या महामार्गासाठी खर्च कमी व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2313 कोटी 56 लाख एवढी रॉयल्टी सूट देऊन टाकली आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण होऊन टोल सुरू होऊपर्यंत कर्जावर तब्बल सहा हजार 396 कोटी 18 लाख रुपये व्याज रस्ते महामंडळ देणार आहे.

या बँकेकडून घेतले आहे कर्ज :- मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गासाठी एसबीआयकडून 8 हजार कोटी, युनियन बँककडून 1700 कोटी, बँक ऑफ इंडिया 1700 कोटी, इंडियन बँक 750 कोटी, इंडियन इन्फ्रा फायनन्स कंपनी 1300 कोटी,बँक ऑफ बडोदा 1500 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र एक हजार कोटी, सिंडिकेट बँक व ओरिएंट बँक प्रत्येकी 500 कोटी, कॅनरा बँक चार हजार कोटी, हुडको 2550 कोटी, युबीआय 1500 कोटी आणि पंजाब नॅशनल बँक तीन हजार कोटी कर्जाच्या स्वरूपात घेण्यात आले आहेत.

कर्जा व्यतिरिक्त असा उभा केला निधी : रस्ते महामंडळाचे साडेतीन हजार कोटींसह राज्य शासनच्या मालकीची सिडको, एमएमआरडीए व इतर महामंडळांकडून साडेपाच हजार कोटी, रॉयल्टी सूट 2414 कोटी, आयडीसी 6396 कोटी आणि जमीन विक्रीतून 9525 कोटी असा 27335 कोटी रुपये निधी उभा केला आहे. यातील महामंडळांच्या कर्जाचे यापूर्वीच शेअरमध्ये रुपांतर केले आहे.

मोठा प्रश्न?:- मित्रांनो खरे पाहता भारतात बुलेट ट्रेनसाठी जपानच्या जायका इंटरनॅशनल या बँकेने अवघ्या 0.1 टक्के दराने कर्ज दिले आहे. विशेष म्हणजे सदर कर्ज पन्नास वर्षे कालावधीसाठी देण्यात आले आहे. याशिवाय एशियन डेव्हलपमेंट सारख्या अनेक बँकांनी देखील शासनाच्या अनेक उपक्रमात अतिशय कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मग आता समृद्धी महामार्गासाठी एवढी समृद्धी का दाखवली गेली हा मोठा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात तसेच जाणकार लोकांच्या मनात आहे. निश्चितच समृद्धी नावातच श्रीमंती असल्यावर पैसा खर्च होणारच….!