Mumbai Nagpur Expressway : बहुचर्चित मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्गबाबत (Samruddhi Mahamarg) एक महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो हा महामार्ग (Expressway) महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यातून आणि 392 गावांमधून जाणार आहे.

या महामार्गामुळे नागपूर (Nagpur) आणि मुंबई (Mumbai) या दोन शहरांमधील अंतर जवळपास सात तासांनी कमी होणार आहे. हा महामार्ग एकूण 710 किलोमीटर लांबीचा राहणार असून, सदर महामार्ग (Highway) तयार करण्यासाठी तब्बल 55 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मित्रांनो हा नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे मधून जाणार आहे. यामुळे या दहा जिल्ह्यांना या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. अंधारी त्या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाडा हे सर्व विभाग जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभाग जोडणारा हा महामार्ग देशातील सर्वात मोठा महामार्ग राहणार आहे.

एवढेच नाही तर या समृद्धी महामार्गाला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे अतिरिक्त चौदा जिल्हे जोडले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला तसेच उद्योगजगताला एक नवीन वळण लाभणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला देखील कलाटणी मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राचा यामुळे विकास होणार आहे. दरम्यान या महामार्गाबाबत एक महत्त्वाचा अपडेट हाती आला आहे.

समृद्धी महामार्गावर तयार करण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या बोगद्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे. मित्रांनो खरे पाहता समृद्धी महामार्गावर एकूण पाच बोगदे राहणार आहेत त्यापैकीच एक आहे इगतपुरी आणि कासारा या दोन शहरांना जोडणारा बोगदा. हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा राहणार आहे. तसेच हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जाणार आहे.

इगतपुरी आणि कासारा यांना जोडणारा हा बोगदा 18 मीटर रुंदीचा आहे. हा बोगदा एकूण 7.78 किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा बनला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनी अफकोन या कंपनीकडे या बोगद्याचे काम देण्यात आले आहे. हा बोगदा आता अंतिम टप्प्यात आला आहे.

हा बोगदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून यामध्ये सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध राहणार आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अफकोन कंपनी या बोगद्यासमवेतच इगतपुरी विभागातील 13 किलो मीटरचे काम करत आहे. यासाठी अफकोन कंपनीला 2745 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मित्रांनो, दोन्ही बाजूच्या बोगद्याला जोडण्यासाठी 26 क्रॉस पॅसेज आहेत. एमर्जेंसी मध्ये याचा उपयोग केला जाऊ शकणार आहे. बोगद्यामध्ये वेंटीलेशनची उत्तम सोय करण्यात आली आहे. व्हेंटिलेशन साठी 54 पंखे प्रति बोगद्यात बसवण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी आणि बोगदा परिसरात कोणी येऊ नये यासाठी उंच भिंती उभारण्यात आल्या आहेत. या बोगद्यातून ताशी 120 किलोमीटरने वाहने धावू शकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

डाव्या बाजुचा बोगदा 7.78 तर उजव्या बाजूचा बोगदा 7.74 किलोमीटर लांबीचा आहे. समृद्धी महामार्गावर असणाऱ्या पाच बोगद्यापैकी या बोगद्याचे काम सर्वात अवघड असल्याचे सांगितले गेले आहे. यासाठी डोंगर फोडून बोगदा तयार करण्यात आला असल्याने याचे काम इतर बोगद्याच्या तुलनेत थोड रिस्की होतं. बोगद्यामध्ये वॉटर मिस्ट सिस्टम ऍक्टिव्हेट करण्यात आली आहे, ही सिस्टम बोगद्यात अग्निकांड झाल्यास ऍक्टिव्ह करता येणार आहे.

बोगद्यात सेल फोन काम करू शकणार आहेत. सध्या कसारा घाट परिसराचा भाग क्रॉस करण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागतो मात्र हा बोगदा जेव्हा चालू होईल तेव्हा अवघ्या 8 मिनिटात घाट परिसर क्रॉस करता येणे शक्य होणार आहे.

हा बोगदा दोन भागात विभागलेला असून एका बोगद्यात तीन लेन म्हणजे दोन बोगद्यात सहा लेन आहेत. निश्चितच हा बोगदा समृद्धी महामार्गाची शान वाढवणारा तसेच घाट परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायद्याचा राहणार आहे. मुंबई नागपूर प्रवास करणार्‍या प्रवाशांना यामुळे निश्‍चितच फायदा होणार आहे.